इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रंथालय विभाग,मराठी,हिंदी,इंग्रजी विभाग आणि भोगावती महाविद्यालय,कुरुकलीचा ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचू आनंदें या विषयावरती एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री अमृत देशमुख यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींनी वाचनाचा आनंद घ्यावा, प्रत्येक वाचलेल्या पुस्तकांमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं,ते आपल्या जगण्यात उतरवा. वाचनाने माणसाचा मन,मेंदू सशक्त होतो, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ.बाबासाहेब दुधाळे हे होते.
विद्यार्थिनींनी सतत काहीतरी नवीन वाचलं पाहिजे, त्यातून बरेच काही शिकायला मिळतं.नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी पुस्तकांना मित्र बनवणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी ए चौगुले यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल प्रशांत कल्लोळी यांनी केले.
ग्रंथपाल मिनाज नायकवडी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800