आपटे वाचन मंदिरमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा संपन्न.
इचलकरंजी (ता.१५) – शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिर येथे जयभवानी विद्या मंदिर या शाळेतील ६० विदयार्थी वाचनालयाची माहिती करुन घेणे, बालविभागस भेट देणे व अभिवाचन ‘ करणेसाठी आले होते. सर्वांनी काही काळ वाचन केले व सात विदयार्थी विद्यार्थीनीनी कथा, माहितीपर लेख, कविता यांचे अभिवाचन केले. कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी वाचन व वाचनालय यांची विस्तृत माहिती दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रकाश पाटील यांनी वाचनालया विषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी अभिवाचन करणारे विदयार्थी-विदयार्थीनी पाहुणे म्हणून स्टेजवर होते. सर्वांनी वाचनाचा आनंद घेतला. दर शनिवारी आमच्या शाळेतील एक वर्ग वाचनालयात वाचायला येईल असे शिक्षकांनी सांगितले.
Cer

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800