इचलकरंजीसाठी १५ हजार,जिल्ह्यासाठी १ लाख इष्टांक वाढीची आ.राहुल आवाडेंची मागणी
इचलकरंजी –
वाढत्या लोकसं‘येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी १ लाख आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी १५ हजार इतका इष्टांक वाढवून मिळावा, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग‘ाहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याकडे केली आहे.
वस्त्रनगरी इचलकरंजी ही कामगार नगरी असून याठिकाणी राज्याच्या कानाकोपर्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने वास्तव्यात आलेल्या कुटुंबांची सं‘या प्रचंड आहे. ही सर्व कुटुंबे शासनाकडून रेशन धान्य दुकानातून मिळणार्या अन्नधान्यावरच अवलंबून आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांशी ग‘ामीण भागातील सर्वसामान्य जनता व कामगार वर्गाचा उदरनिर्वाह हा रेशन धान्यावरच चालतो. परंतु राज्य शासनाकडून सद्यस्थितीत उपलब्ध होणारा धान्य पुरवठा अपुरा पडतो. परिणामी अनेक कुटुंबे पात्र असूनही धान्यापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वंचित कुटूंबियांना अन्न धान्याचा इष्टांक वाढवून मिळावा या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी सविस्तर माहिती घेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी आवश्यक तो इष्टांक वाढवून मिळण्याची मागणी केली आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकांची सं‘या ५१ हजार ८७७ असून युनिट सं‘या २ लाख २० हजार ७३९ इतकी आहे. तर अंत्योदय शिधापत्रिकांची सं‘या ५ लाख ३७ हजार ७७४ असून युनिट सं‘या २२ लाख ८२ हजार ७६ इतकी आहे. परंतु लोकसं‘येत वाढ होत चालल्याने त्याप्रमाणात स्वस्त धान्य उपलब्ध होण्याची गरज आहे. मात्र सध्या ते उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे स्वस्त अन्नधान्यापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे तातडीने लोकसं‘येच्या प्रमाणात स्वस्त अन्नधान्य उपलब्धतेसाठी कोल्हापूर जिल्ह्याला १ लाख आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी १५ हजार इतका इष्टांक वाढवून देण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली आहे. यावर सचिव भोज यांनी सकारत्मकता दर्शवत या संदर्भात उचित मार्गदर्शन मागवून घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800