डीकेएएससी मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
इचलकरंजी:
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले. श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत महाविद्यालयातील एन.सी.सी. व एन.एस.एस. विभागांच्या वतीने आणि जीवनधारा ब्लड बॅंक कोल्हापूर यांच्या विशेष सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. मा. प्राचार्य डॉ. मणेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.०० वाजता या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्त्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे संयोजन एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा. विनायक भोई व एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा. सुनील भोसले व डॉ. व्ही. एस. ढोबळे यांनी केले. विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांचा या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800