डीकेएएससी मध्ये ‘ज्ञानशिदोरी दिन’ संपन्न
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस अर्थात ‘ज्ञानशिदोरी दिन’ उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या समारंभात ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ परीक्षण वाचन व पुस्तक भेट अशा विविध उपक्रमांनी ज्ञानशिदोरी दिन संपन्न झाला. श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह अंतर्गत वांग्मय मंडळ व ग्रंथालय विभागांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देण्यात आले. कु. कोमल कांबळे या विद्यार्थीनीने वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण वाचले. अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले, ” हल्लीच्या डिजिटल युगात विद्यार्थी वाचन संस्कृती पासून दूर जात आहेत. पुस्तकांशी नाते दुरावल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कारांची पेरणी करणे हे आव्हान पालक आणि शिक्षकांसमोर आहे. अशावेळी ज्ञान शिदोरी दिनाच्या निमित्ताने गुरुदेव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन वाचनास प्रेरित करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच मा. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस आपण ‘ज्ञानशिदोरी दिन’ म्हणून साजरा करत असतो. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीन बाहेर पडून विद्यार्थ्यांनी चौफेर वाचनाला सुरुवात केली पाहिजे. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुस्तकच आपल्याला यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतील.” अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रतिमा पूजन आणि संस्था प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. ए. पाटील यांनी केले तर आभार प्रा. रोहित शिंगे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले. यावेळी प्रा. डी. ए. यादव, प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800