कापड व्यावसायिकाची ८९ लाखाची फसवणूक.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,२ आरोपी राजस्थानातून ताब्यात.
इचलकरंजी:
इचलकरंजी येथे कापड व्यवसायातील ८९,१८,७३४ रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी विकास बंशीधर दोसी (वय ४०, व्यवसाय – कापड माल खरेदी-विक्री, रा. भिवंडी, ठाणे) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीच्या मे. विरात्रा कॉटन मिल्स इचलकरंजी फर्ममधून आरोपींनी जून २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत एकूण १.१८ कोटी रुपयांचे ग्रे कापड खरेदी केले. त्यापैकी केवळ २९.४५ लाख रुपये अदा करून उर्वरित ८९.१८लाख रुपये परत करण्यास नकार दिला.
तक्रारी नुसार आरोपी रेखा कुशल सुराना, कुशल सुराना (वय ४८, रा. सोजातिया बास, पाली, राजस्थान), तसेच मुलचंद खांतेड (वय ३२, रा. सोजातिया बास, पाली, राजस्थान) यांनी संगणमत करून फिर्यादीचे आर्थिक नुकसान केले. फिर्यादीकडून उर्वरित रकमेची मागणी केल्यावर आरोपींनी धमकावत पैसे देण्यास नकार दिला व पोलीस कारवाईचा आम्हाला फरक पडत नसल्याची तंबी देत त्यांची फसवणूक केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून १८ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा नोंदवला गेला. आरोपी कुशल सुराना आणि खेतु मुलचंद खांतेड यांना राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. माननीय राजस्थान कोर्टातून ४० तासांचे ट्रांजिट वॉरंट मिळवून पोलीस निरीक्षक साने यांच्या नेतृत्वाखालील कॉन्स्टेबल गजानन बरगाले, चव्हाण,कुलकर्णी,पाटील यांनी आरोपींना घेऊन इचलकरंजीकडे प्रस्थान केले आहे.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज अहवालावरून जिल्हापोलिस प्रमुखांनी गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी दिली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोसई साने यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
शिवाजीनगर पोलिसांची तत्परता-
गुन्हा नोंद झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ पथक स्थापन करून राजस्थान मध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले व तेथील कोर्टात आरोपींचा ४० तासांचा ट्रांजिट रिमांड मिळवला व आरोपीना इचलकरंजी कोर्टात हजर करण्यासाठी प्रस्थान केले,बुधवारी आरोपीना कोर्टात हजर केले जाणार आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800