बिशप इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी:
बिशप्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ना.बा. घोरपडे नाट्यगृहांमध्ये उत्साहामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी ) , प्रकाश नलवडे. (अधीक्षक शालेय पोषण आहार )संस्थेचे चेअरमन हाजी कैश बागवान साहेब व्हाईस चेअरमन इम्तियाज म्हैसाळे सर, ॲडमिनिस्ट्रेटर हुसेन गद्याळ सर ,युवा नेते इम्रान मकानदार , सलीम ढालाईत तसेच माजी नगरसेवक राजू बोंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री जगन्नाथ पाटील साहेबांनी संस्थेच्या घोडदौडीबद्दल कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे चेअरमन हाजी कैश बागवान साहेबांनी संस्थेचा मुख्य उद्देश वंचित व मागास विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच आमचे ध्येय आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेचे व्हाईस चेअरमन हाजी इम्तियाज म्हैशाळे सर यांनी संस्थेची होत असलेल्या प्रगतीचा आलेख मांडून भविष्यातील संस्थेची वाटचाल कशी राहिल याबद्दल आपले मत व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला विद्यार्थ्यांनी सामाजिक, प्रबोधनात्मक व शिक्षणाची प्रेरणा देणारे नृत्य व नाटके अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आली.त्याला उपस्थित पालकांनी भरपूर प्रतिसाद देऊन कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिशप्स इंग्लिश स्कूल प्रायमरी च्या मुख्याध्यापिका वैशाली कोळी व विद्या कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन बिशप्स इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक आयुब आवटी सर यांनी केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800