भाडेकरु कडून घरफोडी – शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहापूर (ता. हातकणंगले): येथील अयोध्यानगर ठाकरे चौक खोतवाडी परिसरात एका गृहिणीच्या घरात चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भाडेकरू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारासघडली. फिर्यादी सौ.माधुरी शितल पाटील या भाजीपाला विक्रीसाठी बाहेर गेल्या असताना, त्यांचे घरात राहणाऱ्या भाडेकरूने (रमेश राजगुरू) आणि त्याच्या दोन साथीदारांनी घरातील तिजोरी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,८५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण,१ तोळ्याची सोन्याची अंगठी,सोन्याच्या दोन साखळ्या व १ लाख रुपये रोख असा मुद्देमाल आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार चळचुक यांच्या प्राथमिक तपासानुसार भाडेकरू रमेश राजगुरू याच्यासह इतर दोन जण चोरीच्या प्रकारात सामील असल्याचा संशय आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800