सर्वांसाठी घरे’ संकल्पनेवर आधारित ‘ प्रधानमंत्री आवास योजना २.०’ या नविन घरकुल योजनेची नोंदणी सुरु

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांसाठी घरे’ संकल्पनेवर आधारित ‘ प्रधानमंत्री आवास योजना २.०’ या नविन घरकुल योजनेची नोंदणी सुरु

     इचलकरंजी
              केंद्र शासन पुरस्कृत ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ अंतर्गत नविन घरकुल मंजूरीकरीता इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील इच्छूक लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी  सुरु करण्यात येत आहे. सदरची नोंदणी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PMAY_SURVEY/EligiblityCheck.aspx  या वेबपोर्टलवर अर्जदाराला  करता येणार आहे.  या नोंदणीसाठी पात्र ठरण्यासाठी  अर्जदाराचे  देशामध्ये तसेच कुटूंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के घर नसावे. अर्जदाराने अथवा त्याच्या कुटुंबातील कोणीही  गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वार्षिक उत्पन्न  कमाल मर्यादा ३.०० लक्ष रुपये आहे. लाभार्थ्यांनी किमान ३० चौरस मीटर पक्के घरकुल (आर.सी.सी.) बांधणे आवश्यक आहे. मंजुरीनंतर पात्र लाभार्थीला पक्के घर बांधणी साठी शासनाद्वारे रु.२.५ लाख प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.यामध्ये राज्य शासनाद्वारे रु. १ लाख व केंद्र शासनाद्वारे रु. १.५ लाख अनुज्ञेय आहेत. पक्के घरकुल बांधणीसाठी लाभार्थीला स्वहिस्सा म्हणून अंदाजे  किमान रु. ५ ते ९ लाख रुपये उभे करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. यापूर्वी गेल्या २० वर्षात कुटुंबाने कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.तसेच लाभ दिला जाणारे घरकुल हे पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावे असेल असे योजनेच्या अटी शर्ती मध्ये नमूद केले आहे . लाभ घेण्यासाठी जागेचा बांधकाम परवाना व घरकुल पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
         या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधारकार्ड (मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक), तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे चालु वर्षाचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक (आधार लिंक असलेले), मालमत्ता पत्रक, बांधकाम परवाना किंवा बांधकाम परवानगीकरिता अर्ज केल्याची प्रत, अर्जदार यांचे आई व वडीलांचे आधारकार्ड (हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र), अर्जदार यांचे कुटूंबामधील सर्व सदस्यांचे आधारकार्ड (पती/पत्नी व अविवाहित मुले), पी.एम.स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी.एम विश्वकर्मा इ. योजनेचा लाभ घेतलेला असल्यास नोंदणी प्रत, रहात्या घराची चालू घरफाळा भरलेची पावती , महापालिकेकडील कार्यलयात उपलब्ध  स्वयंघोषणा पत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. अर्जदार इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.
• प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 मध्ये लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी तपशील काळजीपूर्वक वाचवा आणि समजून घ्यावा. पात्र नागरिकांनी  आवास योजनेसाठी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PMAY_SURVEY/Eligiblity Check.aspx ऑनलाईन अर्ज भरावेत अथवा महानगरपालिकेतील नागरी  सुविधा केंद्र कक्षातील सुविधा मदत केंद्र येथे आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांना अर्ज भरता येतील. याबाबतची अधिक माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या  http://ichalkaranjimnp.in/. या संकेतस्थळावर योजनेची लिंक व तपशील देण्यात आलेले आहेत. इचलकरंजी  महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना कक्षाद्वारे पात्रता पडताळणी केल्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार  पात्र होणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाच्या प्रिंटसह आवश्यक कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य राहील. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी संपूर्ण कागदपत्राच्या मुळ प्रतिसह सदरचे पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन  किंवा इचलकरंजी महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत  येथील ‘प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे आवश्यक कागदपत्रां सह संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More