वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच!

मुंबई-
मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याचे महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. तसेच मंदिरातील ही वस्त्रसंहिता केवळ महिलांना लागू करण्यात आलेली नसून ती सर्वांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी ‘महिलांवर अन्याय’ या स्वरूपाची महिला आयोगाकडे केलेली तक्रार हा खोटा प्रचार आहे. तसेच झेन सदावर्ते यांचे आई–वडिल हे अधिवक्ता असून त्यांना न्यायालयातील इंग्रजाळलेला वकीली ड्रेसकोड अर्थात काळा वकीली पेहराव घालण्याची सक्ती चालत असेल, तर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेवरच आक्षेप का? काळ्या वकीली पेहराव घालण्याची सक्ती उठवा, अशी मागणी वा तक्रार सदावर्ते यांनी न्यायालयात कधी केली आहे का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगांवकर यांनी केला आहे.
केवळ मंदिरेच नव्हे, तर देशभरातील अनेक मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी अनेक धार्मिक स्थळांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. न्यायालय, पोलीस, रुग्णालय
वस्रसंहिता मंदिरांप्रमाणेच चर्चमध्ये आणि मशिदींमध्येही लागू आहेच; मग कधी या विरोधात सदावर्ते यांनी आवाज उठवला आहे का? मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली, असेही कु. प्रतिक्षा यांनी म्हटले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800