डीकेटीई आणि ऍलन करिअर इन्स्टिटयूटमध्ये जेईई आणि नीट कोचिंगसाठी विशेष करार
इचलकरंजी:
डीकेटीई सोसासयटीच्या इचलकरंजी हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज ने देशातील अग्रगण्य कोचिंग संस्था ऍलन करिअर इन्स्टिटयूट सोबत विशेष सहकार्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना जेईई (जॉईंट एन्ट्रान्स एग्झामिनेशन) आणि नीट (नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची विशेष तयारी करता येणार आहे. हा करार ऍलन इन्स्टिटयूट, कोटा राजस्थान येथे संपन्न झाला असून याप्रसंगी डीकेटीईचे ट्रस्टी रवी आवाडे व ऍलन नीट ऍकॅडमिकचे हेड डॉ संजय गौर, यांच्यात कराराचे आदान प्रदान करण्यात आले.
डीकेटीई सोसायटीची स्थापना झाल्यापासून डीकेटीई ने शैक्षणिक क्षेत्रात नेहमी प्रगतीचा चढता आलेख ठेवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणारी संस्था म्हणून डीकेटीई संस्थेचा नावलौकीक जागतिक पातळीवर होत आहे. डीकेटीईच्या ज्ञानाचा वापर इचलकरंजी परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्हावा या हेतुने विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्वक शिक्षण देता यावे यासाठी डीकेटीईने ऍलन करिअर इन्स्टिटयूट सोबत करार केला आहे.
या सहकार्यामुळे डीकेटीईच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसह ऍलनच्या सिध्द झालेल्या कोचिंग पध्दतीचा लाभ डीकेटीई ज्यू.कॉलेच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विशेष व्यवस्थेअंतर्गत, डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना ऍलनची सर्वसमावेशक अभ्यास साहित्य, तज्ञ शिक्षक आणि विषेश परीक्षा तयारीची संसाधने उपलब्ध होणार आहेत. या करारामुळे ऍलनच्या अनुभवी प्राध्यपकांद्वारे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. ऍलनची सिध्द झालेली अभ्यास पध्दती आणि साहित्य तसेच नियमित सराव परिक्षा व कामगिरी विश्लेषण याशिवाय वैयक्तीक मार्गदर्शन आणि शंका निरसन सत्रे अयोजित करणार आहेत. याशिवाय ऍलीन च्या साप्ताहिक व मासिक परिक्षा होणार आहेत. ऍलीनच्या तज्ञांद्वारे दैनंदिन ऑनलाईन लेक्चरस होणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंका निरसन होवून त्यावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन होणार आहे. ऍपद्वारे विद्यार्थ्यांना लेक्चरस अटेंन्डट करता येणार आहेत आणि पालकांना त्यांच्या पाल्याची प्रगती उपस्थिती याचा अहवाल प्राप्त होणार आहे. हया ऍपमध्ये ए.आय. टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्याने एआय वर अधारीत सरावाचे प्रश्न कोणत्याही वेळी उत्तर देणारा चॅटबॉट तयार आहे. सखोल संशोधित आणि अद्यायावत केलेल्या १५ लाखांहून अधिक प्रश्नांच्या प्रश्न बँकेची मोफत आणि संपूर्ण उपलब्धता असणार आहे.
या कार्यक्रमात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांचा नियमित अभ्यास आणि प्रवेश परिक्षेची तयारी यांचा समतोल साधणारी संरचनात्मक पध्दत मिळेल, जी शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम दोन्हींचे संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित होईल. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, व सर्व विश्वस्त यांचे सदर करारासाठी मार्गदर्शन मिळाले. सदर कराराप्रसंगी ऍलन संस्थेचे नीट विभागाचे डॉ एन.के.व्यास,एस.श्रीवास्तव आणि जेईई चे अषिश अजमेरा, गौरव शर्मा उपस्थित होते तर इचलकरंजी हायस्कूलच्या प्राचार्या व्ही.एच.तेलंग, सीएओ पी.एम.सातवेकर, एन.एच.गाडेकर, माला सूद, बी.व्ही.कासार, ए.बी.दानोळे, ए.ओ.भोसले व प्रज्योत चौगुले उपस्थित होते.
फोटो ओळी – कोटा, राजस्थान येथे डीकेटीई व ऍलन करिअर इन्स्टिटयूटमध्ये कराराप्रसंगी डीकेटीईचे ट्रस्टी रवी आवाडे ऍलनचे डॉ संजय गौर व इतर मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800