दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज मध्ये लॉ प्रवेशासंदर्भात कार्यशाळा
इचलकरंजी :- येथील दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून बारावीनंतर पाच वर्ष व पदवीनंतर तीन वर्षाचा लॉ डिग्री कोर्स सुरू होत आहे. याकरिता महाविद्यालयाच्या वतीने एमएच-सीईटी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत *एमएच-सीईटी लॉ स्टडी प्लॅन अँड करिअर अपॉर्च्युनिटी* *या विषयावर पहिल्या सत्रात एडवोकेट प्रीती पटवा* यांचे मार्गदर्शन होणार आहे. सत्र दुसरे यामध्ये प्राध्यापक नरेंद्र शिंदे (से.नि.) भारती विद्यापीठ कोल्हापूर हे *लॉ प्रवेश परीक्षा एमएच-सीईटी लॉ नोंदणी पासून प्रवेश प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व पुढील संधी याबाबत* मार्गदर्शन करणार आहे. सदरची कार्यशाळा महाविद्यालयात शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न होणार आहे या कार्यशाळेचा लाभ इचलकरंजी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी करून घ्यावा असे आव्हान लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर चंद्राणी बागडे यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800
One Response
My home Aadress is the shahu high school near ichalkaranji
Good web site