इचलकरंजीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त दिवटेंचे पंख छाटले.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करत असल्याचे आदेश आज प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले.आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून प्रशासक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणातील घडामोडी व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत वादाची किनार यामागे आहे का असेही नागरिकांतून बोलले जात आहे.
आता तरी आमदार महापालिकेत येणार का?
निवडणूक निकाल लागल्यानंतर जवळपास ७२ दिवस झाले तरी आ.राहुल आवाडे यांनी महापालिकेत प्रवेश केला नाही अथवा विकासकामाचा आढावा घेतला नाही आता आ.राहुल आवाडे महापालिकेत प्रवेश कधी करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दिवटे रजेवर जाण्याची दाट शक्यता-
तडकाफडकी प्रशासक पदाचा कार्यभार काढून घेतल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे रजेवर जाण्याची तसेच लवकरच त्यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800