इचलकरंजीतील स्वामी मळा परिसरात पत्नीचा निर्घृण खून; पती अटकेत.
इचलकरंजी:
शहरातील स्वामी मळा परिसरात एका पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा लोखंडी कोयत्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत मनिषा दिलीप धाहोत्रे (वय ४०) या आपल्या राहत्या घरी असताना त्यांचा पती दिलीप मनोहर धाहोत्रे (वय ४५) याने चारित्र्यावर संशय घेत वाद घातला.वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने लोखंडी कोयत्याने पत्नीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि मानेवर वार करत निर्घृण खून केला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपास अधिकारी पोसई प्रविण साने व प्रभारी अधिकारी पो. नि. सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली.आरोपीला न्यायालयात हजर केले असता १० फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली.याप्रकरणी मयत मनीषा यांचे भाऊ कुमार रामचंद्र काजवे (वय ४९ व्यवसाय -रिक्षाचालक, रा. राजाराम नगर, सातारा) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली. त्यानुसार घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी भेट देत गतीने तपासाची सूत्रे हलवली व आरोपीस ताब्यात घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800