कोल्हापूर पोलीस दलाची गांजा विरोधात विशेष मोहिम: ५५ इसमांवर कारवाई
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाने गांजा आणि तत्सम नशेच्या पदार्थांवर आळा घालण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे.त्यानुसार तीन दिवसांत ४६ गुन्हे दाखल करून ५५ इसमाना ताब्यात घेतले आहे.
मोहिमेच्या पहिल्या तीन दिवसांत (४ ते ६ फेब्रुवारी) कोल्हापूर पोलीसांनी ४६ गुन्हे दाखल करत ५५ इसमांवर कारवाई केली आहे. तसेच गांजा पुरवठादारांच्या ४ जणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गांजा कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आघाडी घेतली असून गांजाच्या साठ्याचा शोध घेतला जात आहे.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गांजा विक्री,सेवन किंवा साठवणूक करणाऱ्यांची माहिती असल्यास त्वरित नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ किंवा स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
ही विशेष मोहिम सातत्याने राबवण्यात येणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800