महापालिकेतील पर्यावरण विभाग प्रभारी अधीक्षक पदी उमेश रमेश कांबळे यांची नियुक्ती
इचलकरंजी:
इचलकरंजी महापालिकेतील पर्यावरण विभाग प्रभारी अधीक्षक पदी उमेश रमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसे पत्र उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिले.
उमेश रमेश कांबळे हे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांची ९ वर्षाहून अधिक सेवा झाली आहे.आरोग्य विभागातील सर्व कामात विशेषत: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या सर्व कामात, कोरोना काळात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत महत्वाचे काम केले आहे.नेहमीच महानगरपालिकेच्या सर्व कामात सक्रिय असलेल्या उमेशने पर्यावरण विषयामध्ये शिवाजी विद्यापठातील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.तसेच औद्योगिक आरोग्य सुरक्षा या विषयात पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे.आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानंतर उपायुक्त काटकर यांनी उमेश कांबळे यांना जबाबदारी दिली.
त्यांच्याकडे आता पर्यावरण अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.पर्यावरण क्षेत्राची त्यांना उत्तम जाण आहे.इचलकरंजी शहरातील पर्यावरण संवर्धनात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800