इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हाअंतर्गत
‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी शहरात डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटना आणि २१ नं. क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात होणार्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून खेळाडूंची नोंदणी करण्यात येत असून नोंदणी झालेल्या खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पध्दतीने संघनिहाय निवड केली जाणार असल्याची माहिती सानिका आवाडे व सुहास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मार्च महिन्याच्या अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. २१ च्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदणी होणार्या खेळाडूंचे १६ संघ बनविण्यात येणार आहेत. या संघांचे चार गटात विभाजन करुन प्रत्येक गटात ४ संघ असणार आहेत. ही स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादीत असून जिल्ह्यातील कोणीही खेळाडू नोंदणी करु शकतो. नोंदणीसाठी २५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे. स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी २९९ रुपये इतकी फॉर्म फी आहे. ही स्पर्धा साखळी पध्दतीने खेळविण्यात येणार असून दररोज ६ सामने खेळविले जातील. स्पर्धेतील विजेत्या संघास आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभा निवडणूकीत मिळविलेल्या मताधिक्य इतके म्हणजे ५६ हजार ८११ रुपयांचे बक्षिस असणार आहे. तर उपविजेत्या संघास २५ हजार तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी १० हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक सामन्यात सामनावीर आणि स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडूंवर वैयक्तिक बक्षिसांची लयलुट केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या खेळाडूंनी २५ फेब्रुवारीपर्यंत नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑक्शनमधून संघनिहाय खेळाडूंची निवड करण्यात येईल, असेही सानिका आवाडे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी जावेद सनदी 9112191020, सुहास कांबळे 9096527210, अक्षय बरगे 9689172673 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अक्षय बरगे, राहुल खामकर, फहिम पाथरवट, नितीन गुलफागे, विनायक आंबिलढोके, राहुल मलके, जावेद सनदी आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800