जयहिंद मंडळ, बालभारत मंडळ, हेरले क्रीडा मंडळ, शाहू सडोली संघांची विजयी सलामी,गुरुवर्य डी. एन. कौंदाडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित किशोर किशोरी निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात.
इचलकरंजी
जेष्ठ कबड्डी खेळाडू गुरुवर्य प्रा.डी. एन. कौंदाडे सर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त बालभारत क्रीडा मंडळ येथे किशोर किशोरी निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात झाली. यामध्ये जयहिंद मंडळ, बालभारत मंडळ, हेरले क्रीडा मंडळ, शाहू सडोली या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी जेष्ठ कबड्डी खेळाडू गुरुवर्य प्रा.डी. एन. कौंदाडे सर यांचा 81 वा वाढदिवस सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अशोक बापू माने यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करणेत आला. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करणेत आले. यावेळी संयोजक श्री.राहुल खंजिरे यांनी आपल्या प्रास्ताविकात बालभारत क्रीडामंडळ, क्रीडा क्षेत्र व प्रा.डी. एन. कौंदाडे सर यांचे योगदान विषद केले. तसेच सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे यांचे खेळाप्रती असलेले प्रेम व खंबीर साथ यामुळेच उपस्थित असलेबद्दल विशेष कौतुक केले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कबड्डी खेळाचा इतिहास उलगडला व नवीन खेळाडूना शुभेच्छा दिल्या. बालभारत मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात बालभारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डी,खो-खो, पोलीस प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवीत असलेचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शिंदे सर यांनी केले तर आभार कार्तिक बचाटे यांनी मानले. यावेळी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह संभाजी पाटील ,उपाध्यक्ष भगवान पवार, रमेश भेंडीगिरी, उदय चव्हाण, आण्णासो गावडे, विलासराव खानविलकर, अजित पाटील कोल्हापूर जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुनकर, सामन्याचे निरीक्षक शेखर शहा, माजी नगरसेवक श्रीरंग खवरे, मराठा मंडळाचे संचालक राजेंद्र बचाटे, जनता बँकेचे संचालक बाळकृष्ण पवळे, शंकर पवार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण फाटक, व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आज झालेले सामने पुढील प्रमाणे
एस एम जोशी विरुद्ध शिवभक्त येळवडे (३६-४३) झालेल्या सामन्यात येळवडे हा संघ ७ गुणांनी विजयी
ज्योतिर्लिंग शिरगाव विरुद्ध मावळा सोडली (१२-४३) मावळा सोडली हा संघ ३१ गुणांनी विजयी
जय शिवराय विरुद्ध जय हिंद इचलकरंजी (४३-४१) जयहिंद इचलकरंजी हा संघ ७ गुणांनी विजयी
शिवप्रेमी शिरोली विरूद्ध राष्ट्रसेवक तळसंदे (२२-११) या सामन्यात शिवप्रेमी शिरोली हा संघ ११ गुणांनी विजयी
छावा शिरोली विरुद्ध बालभारती इचलकरंजी (१३-३५) बालभारत इचलकरंजी हा संघ २२ गुणांनी विजय
या स्पर्धा यशस्वी करणेकरिता बालभारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, उत्कर्ष सूर्यवंशी,आनंदा कौंदाडे,मिलिंद नवनाळे,कार्तिक बचाटे,ओंकार धुमाळ, अमोल सूर्यवंशी,अमित पाटील, योगेश कौंदाडे व बालभारत क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800