युवा स्पंदन समूह नृत्य स्पर्धेत डी के ए एस सी मुलींचा संघ प्रथम
इचलकरंजी:
येथे सुरू असलेल्या युवास्पंदन या स्पर्धा उपक्रमातील समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक डी के ए एस सी कॉलेज मुलींच्या संघाने मिळविले. वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक अनुष्का भंडारे हिने मिळविला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
यावेळी झालेल्या समूह नृत्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ए के डान्स स्टुडिओ इचलकरंजी या संघाने मिळविला तर अनया फाउंडेशन इचलकरंजी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. याचबरोबर डी के ए एस सी मुलांचा संघ उत्तेजनार्थ ठरला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांक सानिका बडवे कोल्हापूर हिने मिळविला तर तृतीय क्रमांक सागर माने याने मिळविला. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षिसे श्रद्धा बडवे इचलकरंजी आणि विवेका पुकाळे जयसिंगपूर यांनी मिळविली.
या स्पर्धांचे परीक्षक या नात्याने बाळकृष्ण विभुते मिरज, अमिषा करंबेळकर कोल्हापूर आणि पद्मश्री बागवडेकर कोल्हापूर यांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी पार पडली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सर्व परीक्षक तसेच रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील व सेक्रेटरी नागेश दिवटे, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे व नृत्य स्पर्धा समन्वयक सौ. सायली होगाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना “युवा स्पंदन स्पर्धेच्या माध्यमातून युवा वर्गाच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्व विकासात तसेच जीवनाच्या वाटचालीत या स्पर्धा उपयुक्त ठरतात, त्यामुळे स्पर्धकांनी कलेची उपासना सातत्याने सुरू ठेवावी” अशा आशयाचे उदगार परीक्षकांनी काढले.
स्पर्धेच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्लचे माजी अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मनोरंजन मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक बोरगावकर यांच्या हस्ते परीक्षकांना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय होगाडे यांनी केले तर परीक्षकांचा परिचय कपिल पिसे यांनी करून दिला. स्पर्धेचे सूत्र संचालन सचिन चौधरी व निखिल शिंदे यांनी केले तर व्यवस्थापन श्रेया सवदी आणि महेश सोलापुरे यांनी केले. शेवटी समीर गोवंडे यांनी आभार व्यक्त केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेस इचलकरंजी व परिसरातील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
युवा स्पंदन – समुह नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणारा संघ

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800