आपटे वाचन मंदिरात कथाकथन स्पर्धा संपन्न
इचलकरंजी:
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिर येथे कै. रामभाऊ आपटे पुण्यतिथीनिमित्त इयत्ता ३ री व ४ थी च्या इचलकरंजी शहरपातळीवर कथाकथन स्पर्धा झाल्या त्यामध्ये ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सर्वच स्पर्धक चांगल्या तयारीनिशी आले होते. संचालक श्री. काशिनाथ जगदाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विजेत्या स्पर्धकांना दैनिक लोकसत्ताचे पत्रकार श्री. दयानंद लिपारे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यांनी स्पर्धकांना स्वत:च्या अनुभवातून वाचनालयाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून मा. अनुराधा काळे व मा. प्राची कुलकर्णी यांनी काम पाहिले. मा. अनुराधा काळे यांनी परीक्षक या नात्याने मनोगतातून मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या प्रारंभी प्रास्ताविक अध्यक्ष सी. सुषमा दातार यांनी केले. कै. रामभाऊ आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन दोनही परीक्षकांनी केले.
याप्रसंगी सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम, संचालक श्री. अशोक केसरकर, प्रा. मोहन पुजारी हे उपस्थित होते. मार्गदर्शक शिक्षक, पालक व सर्व स्पर्धक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी केले.
विजते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कु. आरोही सुशांत गुरव (कै. बाळकृष्ण सांगले विद्या मंदिर, इचलकरंजी),व्दितीय क्रमांक-कु. सावली प्रदिप कागे (मालती माने विद्यालय, इचलकरंजी),तृतीय क्रमांक – चि. विहान अमोल खोत (माई बाल विद्या मंदिर, इचलकरंजी)
उत्तेजनार्थ -कु.गायत्री प्रशांत जाखले (श्री. बालाजी विद्या मंदिर, इचलकरंजी) कु. प्रांजल प्रमोद शेटके (रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन शाळा क्र. २७, इचलकरंजी) हे आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800