पाणीपुरवठा सुरळीत करा,रस्ते कामावर नियंत्रण ठेवा-महाविकास आघाडी
इचलकरंजी
आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेत स्वागत केले व पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देत चर्चा केली. कृष्णा जलवाहिनी बदलण्याच्या कामातील विलंब व शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न उपस्थित करत चर्चा करण्यात आली.
इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून मजरेवाडी उदभव धरून पाणीपुरवठा केला जातो. यातील ५.२ किलोमीटरची सातत्याने गळती लागणारी पाईपलाईन बदलण्याचे काम महाराष्ट्र शासनाने मंजूर केले होते. या कामाची निविदा इलेकॉन एनर्जी यांना मंजूर होऊन इचलकरंजी महानगरपालिकेने त्यांना वर्कऑर्डर जून २०२३ रोजी दिली होती.सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत नऊ महिने म्हणजे मार्च २०२४ अखेर होती. यासंदर्भात मविआने सातत्याने पाठपुरावा केला असून अद्यापही या पाईपलाईन बदलाचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने वेळोवेळी लेखी तोंडी मागणी करत चर्चा केली प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु त्या कामांमध्ये कोणतीच प्रगती झालेली नसून अद्यापही काम जैसे थे च आहे.वरील कामातील विलंबामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे सध्या शहराला चार दिवस ते आठ दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या काळात शहराचे पाण्यावाचून प्रचंड हाल होणार आहेत वरील सर्व बाबींची गंभीरपणे दखल घेऊन कृष्णा पाईपलाईन योजनेचे काम तातडीने पूर्ण करणेत यावे. तसेच शहराचा सातत्याने विस्कळीत होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली यावर आयुक्तांनी १५ दिवसात मक्तेदारास काम पुर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
सुळकुड योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वानी राजकारण विरहित प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थिताना केले.
यावेळी अजित जाधव,प्रधान माळी,प्रकाश मोरबाळे,राजु आलासे,नितीन कोकणे,मंगेश कांबुरे,अजित मिणेकर,बाबासो कोतवाल,सुशांत कोटगी,किशोर जोशी,गोविंद आढाव उपस्थित होते.
५२ कोटीच्या कामात नियंत्रण ठेवा-सागर चाळके.
शहरात नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या कामाचा निधी आपल्याकडे वर्ग करावा किंवा नियंत्रण आपल्याकडे ठेवावे अशी मागणी सागर चाळके यांनी केली.
सुळकुड योजनेवर लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प- शशांक बावचकर.
सुळकुड विषयावर आयुक्तांशी बोलताना शशांक बावचकर यांनी प्रश्न राज्यसरकारकडे प्रलंबित असतानाही खासदार व आमदार मुग गिळून गप्प असल्याबाबत खेद व्यक्त केला.पर्यायी योजना करण्याच्या नादात आधीच्या योजना रद्द झाल्या असुन सुळकुडवर भर देऊन योजना मार्गी लावावी असे बावचकर यांनी मत व्यक्त केले.
म्हसोबा मंदिर रस्ता तातडीने करा- उदयसिंग पाटील.
म्हसोबा मंदिर रस्ता हा ५२ कोटीतील कामात मंजूर असून एप्रिलमध्ये यात्रा असल्याने भाविकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी तो रस्ता त्वरित होणे गरजेचे असल्याचे मत उदयसिंग पाटील यांनी व्यक्त केले.
पाणीपट्टी साठी कनेक्शन तोडू नका-सदा मलाबादे,संजय कांबळे.
शहरात नियमित पाणीपुरवठा नसताना आपण थकीत पाणीपट्टी साठी कनेक्शन तोडू नका,पाणीपुरवठा सुरळीत करा नंतर कारवाई करा अशी मागणी सदा मलाबादे व संजय कांबळे यांनी केली.
रस्तेकामाचे नियंत्रण पालिकेकडे घेण्याचे प्रयत्न-आयुक्त पल्लवी पाटील
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्तेकामाचा निधी आपल्याकडे घेण्याबाबत प्रयत्न सुरू असून नसल्यास नियंत्रण तरी महापालिकेकडे असावे अशी मागणी केली आहे, तसेच इचलकरंजी शहरास दोन्ही योजनातुन ५० टक्के पेक्षा कमी पाणी मिळत असल्याने सुळकुड बरोबर पर्यायी म्हैशाळ येथील आरक्षित पाण्याबाबत ही विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले,शहापूर येथील रस्ताकामात लक्ष देऊ असे सांगताना पाणीपट्टी कारवाईबाबत थकीत पाणीपट्टी ८३% असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800