कन्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्तरावरील गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश…..
गुरुदेव कार्यकर्त्यांमधून प्रा.निकिता बडे गोल्ड मेडल तर विद्यार्थिनीमधून कु.दिव्या बिरंगे सिल्वर मेडल च्या मानकरी….
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि गांधी विचार संस्कार फौंडेशन,जळगाव यांच्या मार्फत *गांधी विचार संस्कार परीक्षेचे* आयोजन करण्यात येते.
याहीवर्षी आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते यांनी विशेष यश संपादित केल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.बाबासाहेब दुधाळे म्हणाले की, “महात्मा गांधींची वैश्विक विचारधारा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. विश्वशांतता, ग्रामराज्य, रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी राज्यकर्त्या वर्गाने व जनसमुदायाने कोणती पावले उचलली पाहिजेत याविषयीचे ज्ञान महात्मा गांधींच्या एकंदरीतच विचारधारेच्या माध्यमातून समजून घेता येते. महात्मा गांधींचा सारा जीवनपटच प्रेरणाशक्तीप्रमाणे कार्य करतो.”
दरवर्षी अकरावी ते तृतीय वर्ष पदवी पर्यंतच्या विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद यांच्यासाठी या परीक्षांचे आयोजन केले जाते. याहीवर्षी विद्यार्थ्यीनी व प्राध्यापक असे 56 जण यामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत विभाग स्तरावर नंबर काढण्यात येतात. यामध्ये बी.ए भाग दोनची विद्यार्थिनी कु.दिव्या शिवाजी बिरंगे हिने कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक संपादित करून सिल्वर मेडल प्राप्त केले. तसेच प्राध्यापक वर्ग या गटातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रा. निकिता संजय बडे यांनी प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल, प्रा. शाहीन जिंदाशा फकीर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक व सिल्वर मेडल तर प्रा. प्रिया शशिकांत सुतार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय क्रमांक व ब्राॅन्झ मेडल संपादित केले.
गांधी विचार संस्कार परीक्षांच्या यशस्वी आयोजनाबद्दल समन्वयक प्रा.वर्षा पोतदार यांचेही शिल्ड देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व यशस्वी प्राध्यापक, विद्यार्थिनी यांचे महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांनी अभिनंदन केले.
डॉ. मनोज जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. तर प्रा उदय कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800