स्वराज्याचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे :युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वराज्याचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे :युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज.

स्वराज्याचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते. तसेच बंडखोर फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे, कर्तव्यकठोर,न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल!
आज संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना मनात मनात एकच प्रश्न पडतो की की साडेतीनशे वर्षाहूनी अधिक काळ उलटून गेल्यानंतरही ते आपल्याला आजही हवेहवेसे आणि आदरणीय आदर्श का वाटतात ? याची बीजे महाराजांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीत व दुर्दृष्टीत आहेत. पु ल देशपांडे असं म्हणतात की राजे महाराजांच्या काळात एखाद्या राजाच्या गळ्यात किती सोन्या-मोत्यांचे अलंकार असले तरी आवर्जून कवड्यांची माळ राजे धारण करायचे याचे विचार करायला लावणारे कारण म्हणजे राजाने प्रजेच्या सुखापुढे कल्याण पुढे स्वतःचे सुख दुःख, आराम कवडीमोल समजायचा असतो राजाला सारी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत असतानाही उपभोग शून्य स्वामी असे। म्हटले जायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युगप्रवर्तक म्हणतो तेव्हा छत्रपतींच्या जन्मापूर्वीचे युग कसे होते आणि शिवरायांच्या राज्यकारभारातून नेमके कोणते युग सुरू झाले हे पाहावे लागते .छत्रपती युगप्रवर्तक म्हणण्यासाठी एका महत्त्वाच्या परिवर्तनाकडे पाहावे लागते ते म्हणजे छत्रपतींचे सरदार व अन्य पदाधिकारी यापैकी कुठलाही कुणालाही छत्रपतींनी वतने दिली नाहीत. वतनदारी पद्धत बंद करून वेतन सुरू केले. वतनदारांना वेतनदार बनवण्याचे परिवर्तन कल्पनातीत आहे. शिवछत्रपतींच्या समकालीनांच्याच नव्हे तर त्यांच्यानंतर येणाऱ्या काळातही हे परिवर्तन खूप वेगळे आणि विचारपूर्वक केलेले होते, हे दिसून येते. वतनदारांना त्यांच्या वतनामध्ये सारा गोळा करण्याचा पूर्ण हक्क मिळत असे. त्याचा अनेक वेळा दुरुपयोग होत असे. वतनदारांमुळे राजा थेट प्रजेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्या मार्गात वतनदारीची पोलादी भिंत उभी असायची. वतनदारांचे अन्याय, अत्याचार राजापर्यंत पोहोचत नसायचे. त्यामुळे राजा हा जनतेचा प्रगल्भ प्रतिनिधी बनायला हवा असेल तर वतनदारांच्या मध्यस्थांचा वर्ग नाहीसा केला पाहिजे या बिनतोड विचारातून वतनदारी पद्धत बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला
छत्रपती शिवरायांचा आणखी एक महत्वाचा गन म्हणजे त्यांची असणारी विज्ञाननिष्ठा.. शिवछत्रपतींनी कधीही धर्मातील ताज्य रूढी परंपरा आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात स्थान दिले नाही. वडील शहाजीराजे यांचे निधन झाल्यावर त्यांनी मासाहेब जिजाऊ यांना सती जाऊ दिले नाही.महाराजांनी केलेल्या सगळ्या लढाया या रात्रीच्या आणि त्यापैकी काही लढाया या अमावास्येच्या रात्री झाल्या.प्रचलित काळात अमावस्या अशुभ मनाली जाई. त्या काळात शिवछत्रपती महाराज लढले आणि जिंकलेही !
छत्रपती शिवरायांनी हाती तलवार घेतली पण निष्पापांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो ते आई भवानीचा कौल मागण्याइतके धार्मिक जसे होते
एक महान भारतीय राजा परकीयांशी संघर्ष करून जिद्दीने हिंमतीने शून्यातून स्वतःचे राज्य निर्माण केले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याचा भगवा फडकवला.भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही. भगवा म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचा हा भगवा म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या भगवान श्री कृष्णांचा हा भगवा म्हणजे राम कृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा म्हणजे हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा हा भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती होय.
छत्रपतींच्या जयंती दिवशी शिवरायांचा जयघोष करणे सोपे आहे त्याऐवजी शिवछत्रपतींनी या मातीला समाज्याला जो विचार दिलाय त्यांतून प्रेरणा घेऊन त्यांची ती शिकवण चरित्रातून जाणून घेऊन त्याचा रोजच्या जीवनात उपयोग करू हीच असेल शिवरायांच्या मनातील खरी शिवजयंती….
“सह्याद्रीच्या सिंह गर्जतो,शिवशंभू राजा;
दरिदरीतू नाद गुंजला,महाराष्ट्र माझा

करण शिरोले,इचलकरंजी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More