डीकेटीईच्या‘जयोस्तुते २०२५‘ स्नेहसंमेलनास शिवजन्मोत्सवाने मोठया दिमाखात सुरवात.
डीकेटीई संस्थेचे स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या आकर्षणाचा विषय आहे. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाडयामध्ये घडवितात. ‘जयोस्तुते २०२५‘ स्नेहसंमेलनाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ढोलपथकाने मानंवदना देवून मोठया दिमाखात साजरी करण्यात आली. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांच्या हस्ते शिवरायांच्या चित्रफलकांचे अनावरण करण्यात आले.
डीकेटीई मध्ये दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान डान्स शो, व्हरायटी शो, रक्तदान, जिनीअस, फोटोग्राफी, फिशपॉंड अशा भव्य कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी व स्टाफ यांनी रक्तदान केले.
डीकेटीईचा ट्रॅडीशनल डे अर्थात पारंपरिक पोषाख दिन हा वेगवेगळया कलाकृतीतून संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य अशा मिरवणुकीने आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालून शिवगर्जना ढोलपथकाने मानवंदना देवून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्याबरोबर लेझिम, हलगी व मर्दानी खेळांचे दर्जेदार प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विविध वेशभुषेमध्ये जसे की, छ. शिवाजी महाराज, मावळे, साधू, संत, दाक्षिणात्य वेषभूषा इ. विविध वेषभूषांचे विद्यार्थ्यांच्या मार्फत सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात आणि कौतुकाची थाप मिळवितात.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, आमदार डॉ राहुल आवाडे, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर रवी आवाडे, मौसमी आवाडे, सानिका आवाडे व सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी डायरेक्टर प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी कानिटकर प्रा.ए.व्ही.शहा, डॉ. ए.आर.बलवान, प्रा.ए.यु.अवसरे, विघार्थीप्रतिनिधी यश पाटील, शाम कोरवी, सौरभ शहा, पार्थ लाड यांचेसह सर्व डीन्स, विभागप्रमुख, स्टाफ, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- क्र.१ डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनादिवशी लेझिमची कला सादर करीत असताना डीकेटीईचे विद्यार्थी
फोटो ओळी- क्र.२ डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त छ. शिवाजी महाराज यांच्या वेशात डीकेटीईचे विद्यार्थी
फोटो ओळी- क्र.३ डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त शिवजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, एल.एस.आडमुठे व विद्यार्थी
फोटो ओळी क्र. ४ ते ७ डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त आपली कला सादर करीत असताना विद्यार्थी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800