भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
इचलकरंजी ता. १९ फेब्रुवारीदेशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती. भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे परंपरेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयघोषात अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय कार्य, निस्सीम राष्ट्रप्रेम, समानता, राजकता, धर्मप्रेम व त्यांची हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठीची अनाकलनीय निष्ठाया गोष्टींचा उल्लेख करत त्यांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकरण करावे असे सुरेश हळवणकर यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी प्रयत्न करावे असे म्हणाले.
तसेच शिवतीर्थ येथे हि छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुड पुतळ्यास पुष्पहार पुष्पवृष्टी करून मानाचा मुजरा करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून कार्यलय परिसरात सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे राहुल आवाडे, शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, ज्येष्ट नेते अशोक स्वामी, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पवार, भरत भोंगार्डे, नरसिंग पारीख, राजेंद्र आरेकर, सचिन माळी, सौ. अश्विनी कुबडगे सौ. मोसमी आवाडे, सौ.नीता भोसले, नागुबाई लोंढे, महेश पाटील, दीपक पाटील, शेखर शहा, अनिस म्हालदार, अॅड.भरत जोशी, गुंडू गोरे, अविनाश कांबळे, राहुल घाट, संजय केंगार, आकाशा मुल्ला, प्रदीप दरिबे, चंद्रकांत इंगवले, भानुदास तासगावे, सुधीर पाटील राजू भाकरे, विजय पवळे, हर्षवर्धन गोरे, नितीन पडियार तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800