श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
इचलकरंजी
शिवजयंती निमित्त इतिहास विभागाच्या वतीने लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात लाठीकाठी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माननीय श्रीराम साळुंखे सर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ धीरज शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्रीराम साळुंखे सर म्हणाले की, आजच्या काळात मुलींनी शिवकालीन युद्ध कलांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे,लाठी-काठी चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी साठी सुरू केले त्याबद्दल इतिहास विभाग आणि महाविद्यालयाला शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे उपस्थित होते.
सौ रेंदाळे मॅडम विद्यार्थिनींना दररोज लाठीकाठी चे प्रशिक्षण देणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले तर आभार डॉ.राजश्री मालेकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800