स्वतःच्या घरकुलाची इच्छा पंतप्रधान आवास योजनेतून पुर्ण-आ.राहुल आवाडे
इचलकरंजी –
प्रत्येक व्यक्तीचे आपले हक्काचे घर असावे असे वर्षानुवषाचे स्वप्न असते. स्वतःच्या डोकीवर आपल्या हक्काचा निवारा असावा, अशी प्रत्येक गोरगरीब बेघर माणसाची इच्छा असते. ते स्वप्न व इच्छा प्रधानमंत्री आवास घरकुलाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. ही घरकुले शंभर दिवसांत पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबियांच्या जीवनात जो आनंद फुलेल ते अनमोल असेल, असे उद्गार आमदार राहुल आवाडे यांनी काढले. त्याबरोबर शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न व्हावा, त्यापसून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
चंदुर (ता.हातकणंगले) येथे प्रधानमंत्री आवास योजना ग‘ामीण टप्पा २ अंतर्गत चंदूर येथील बसवेश्वर मंगल कार्यालयात इचलकंरजी विधानसभा मतदारसंघातील चंदुर, कबनूर, तारदाळ, खोतवाडी व कोरोची गावातील ३७८ पैकी ३५२ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि डीबीटीद्वारे पहिल्या हप्त्याचे वितरण आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. यावेळी पुणे येथील मु‘य कार्यक‘माचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हातकणंगले पंचायत समिती व पाच गावांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक‘म पार पडला.
पुढे बोलताना आमदार आवाडे यांनी, सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शंभर दिवसांत विनाअडथळा घरकुल पूर्ण करावे. घरकुल पूर्ण पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिकरित्या लाभार्थ्यांना दहा हजार रुपये निधी दिला जाईल, असे जाहीर केले.
कार्यक‘माची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे सर्व ग‘ामपंचायत सदस्य तसेच कबनूर कोरोची, खोतवाडी, तारदाळ गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी रामन्ना, सहाय्यक गट विकास अधिकारी यु. के. महाले , श्रीमती शालन पाटील, धुळाप्पा पुजारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत सरपंच स्नेहल कांबळे यांनी तर प्रास्ताविक सहाय्यक गट विकास अधिकारी यू. के. महाले यांनी केले. हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी, घरकुल संदर्भातील विविध योजना राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी आपले हक्काचा निवारा घरकुलच्या रूपाने पूर्ण करावा. शासनाने घरकुल निधीमध्ये ५० हजार रुपयांची वाढ केली असून आता २ लाख १० हजार रुपये घरकुलासाठी निधी मिळणार आहे. शासनाने दिलेल्या वेळेत पूर्ण करून घ्यावे. तर या टप्प्यातील उर्वरीत २६ लाभार्थ्यांना कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन सचिन हळदे, संजय जिंदे यांनी केले. आभार संदीप कांबळे यांनी मानले.

फोटो -घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करताना आमदार राहुल आवाडे, महेश पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व इतर मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800