शंकरराव पुजारी जलतरण तलावात ११ वर्षीय मुलाला बुडताना वाचवण्यात यश,उदयसिंह निंबाळकरांची तत्परता
इचलकरंजी:
नुकताच नूतनीकरणानंतर खुले करण्यात आलेल्या शंकरराव पुजारी जलतरण तलावात आज पोहण्याच्या स्पर्धा सुरू असताना हनुमंत सुरेश बागडी (वय ११, रा. चांदणी चौक) या मुलाला पाण्यात बुडताना वाचवण्यात यश आले. जलतरण तलावातील प्रशिक्षक उदयसिंह निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतल्याने मुलाचा जीव वाचला.
आज तलावात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,जलतरण स्पर्धा सुरू असताना हनुमंत बागडी या मुलाने स्पर्धेशी कोणताही संबंध नसतानाही जलतरण तलावात पोहण्यासाठी उडी मारली.सुरुवातीला चार फुट पाण्यात उतरल्यावर तो पुढे घसरून आठ फुट खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला.उपस्थित तरुणांच्या लक्षात येताच आरडाओरडा सुरू झाला. प्रशिक्षक उदयसिंह निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित पाण्यात उडी घेत हनुमंतला बाहेर काढले.तेथेच मुलाला प्राथमिक उपचार देऊन तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती धोक्याबाहेर गेल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.
प्रशिक्षकांच्या तत्परतेचे कौतुक:
प्रशिक्षक उदयसिंह निंबाळकर व सहकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे ११ वर्षीय मुलाचा जीव वाचल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यापूर्वीही अनेकांचे जीव उदयसिंह निंबाळकर यांनी वाचवले आहेेेत,घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.जीवरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800