स्वरतरंग अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त गायन स्पर्धेत लहान गटात अपूर्वा जावळे तर मोठ्या गटात सपना कोरवी प्रथम.
इचलकरंजी
स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कराओके स्टार गायन स्पर्धेत खालील स्पर्धकांनी यश मिळवले.लहान गट-प्रथम क्रमांक अपूर्वा जावळे (इचलकरंजी),द्वितीय क्रमांक आयुषी माळी (कासेगांव),तृतीय क्रमांक दीक्षा पाटील (जांभळी)मोठा गट-प्रथम क्रमांक सपना कोरवी (गडहिंग्लज),द्वितीय क्रमांक अतुल कांबळे (नरसिंह वाडी),तृतीय क्रमांक केतकी पाटील (चंदूर),उत्तेजनार्थ श्री किशोर खोत / सौ. कोमल घाडगे इचल. यांनी प्राविण्य दाखवले. गेली सात वर्ष तबला, हार्मोनियम, गायन व कराओकेचे प्रशिक्षण भोनेमाळ मध्ये स्वरतरंग संगीत अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना दिले जात असून ७२ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सलग सहा वर्ष शंभर टक्के निकाल देणारी ही संस्था असून या संस्थेचा सातवा वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन जगदंबा सत्संग भवन येथे करण्यात आलेले होते .त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला .१०१ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अतिशय उत्तम आणि नेटके नियोजन स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या कलाकारानी व संस्थापक अध्यक्ष श्री कोरे सर यांनी केलेले होते. कलाकारांना चहा नाश्ता व्यवस्था केल्यामुळे सर्वच कलाकार समाधानी होते. या स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली ,मिरज, कराड, सातारा ,मुंबई कागल निपाणी कारदगा येथून स्पर्धक आलेले होते. उत्तम साऊंड सिस्टिम बैठक व्यवस्था लाईट इफेक्ट्स व कलाकारांची सेवा या भावनेतून हा कार्यक्रम दर्जेदार कलाकार व रसिक त्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. असेच कार्यक्रम वरचेवर व्हावेत असे रसिकांच्या वतीने विनंती करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष मा. श्री. आशिष खंडेलवाल ,श्री अमृत मामा भोसले ,श्रीनिवास पाटील ,सचिन माने, डॉ. शुभांगी कोरे ,सौ भक्ती माळी व स्वतरांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रम अतिशय दर्जेदार पार पडला परीक्षक म्हणून श्वेता जाधव व पवन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800