मराठी भाषा गौरव दिन कन्या महाविद्यालयात उत्साहात संपन्न
इचलकरंजी:
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित व्याख्यानात सौ. एकता जाधव यांनी अभिजात मराठी आणि कुसुमाग्रज या विषयावर आपले विचार मांडले. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे अभिजात मराठी भाषेच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना मराठी भाषा सुमारे अडीच हजार वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे. प्राचीन कालखंडापासून मराठी साहित्यात निर्माण झालेली स्थित्यंतरे त्यांनी अधोरेखित केली. आद्यकवी मुकुंदराजांपासून ते शाहिरी वांग्मयाचा आढावा घेत आधुनिक कवी केशवसुतांचे मराठी साहित्यातील महत्त्व स्पष्ट केले. रविकिरण मंडळाच्या प्रभावातून कुसुमाग्रस्त वि. वा. शिरवाडकर हे पुढे आले. त्यांच्या ‘विशाखा’ कवितासंग्रह ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे मराठी साहित्यिक होत. त्यांनी कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेखन, समीक्षा, अनुवाद, बालसाहित्य इ. वा वाड्मय प्रवाहमधून साहित्य लेखन केले आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये कुसुमाग्रजांचा मोठा वाटा आहे ‘नटसम्राट’’ प्राचार्या हे अजरामर कलाकृती त्यांच्या कार्याचा गौरव करते असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे हे होते. ते म्हणाले, मराठी भाषा ही विविध बोलींनी समृद्ध झाली आहे अभिजात मराठी ही इसवी सन पूर्व काळापासून आपले अस्तित्व टिकवून आहे अभिजात मराठी म्हणून तिचे कार्य सिद्ध होते आहे कुसुमाग्रज हे थोर साहित्यिक आहेत त्यांच्या अनेक कविता आणि नाटके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रियांका कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी सारिका वाघमोडे हिने केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, कर्मचारीवर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक शुभांगी नाकील यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800