व्यवसाय व उद्योगासाठी सचोटी, नियमितता, व शोधक वृत्ती असली पाहिजे-(डॉ.) व्ही. एन. शिंदे.
कोल्हापूर दि. २५ लोकमंगल उद्योगसमूहा मार्फत कोल्हापूर येथे नवउद्योजकांसाठी कोणत्या शासकीय कर्ज योजना उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या उद्योजकता मेळाव्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे. यांनी वरील उद्गार काढले.
सर्वानीच नोकरीच्या मागे न लागता प्रामाणिकपणे सचोटीने तसेच विविध संधीचा शोध घेवून व्यवसायामध्ये आपले करिअर शोधले तर स्वतःचा रोजगार प्राप्त होतोच तसेच इतरांना रोजगार उपलब्ध करून देता येतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल पतसंस्थेचे तज्ञ संचालक (डॉ.) व्ही. एस. ढेकळे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ चा जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील यांनी महामंडळाकडे असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक शिंदे यांनी सदर महामंडळाच्या विविध कर्ज योजनेची माहिती दिली. लोकमंगल पतसंस्था, लोकमंगल बँक, लोकमंगल मल्टीस्टेट या संस्थाच्या विविध कर्ज योजना यांची माहिती श्री. राजेशसिंह बायस (लोकमंगल बँक CEO).
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुदन सुरवसे यांनी केले व संचालक श्री. शीतल शहाणे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800