विणकरांच्या मागण्यांसाठी ५ मार्चपासून पुण्यात आंदोलन.
पुणे:
विशेष मागास प्रवर्ग (SBC) अंतर्गत २% स्वतंत्र आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी ५ मार्च २०२५ पासून पुण्यातील बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात पद्मशाली, कोष्टी, साळी, स्वकुळ साळी आदी समाजातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
१९९४ साली ओबीसी प्रवर्गातील काही जातींसाठी विशेष मागास प्रवर्ग (SBC) निर्माण करण्यात आला होता. त्यांना २% स्वतंत्र आरक्षण आणि १२ प्रकारच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आज ३० वर्षांनंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.या मागण्यांसाठी सन २००० पासून दरवर्षी उपोषण, धरणे व शांततामय मार्गाने आंदोलने केली जात आहेत. शासन दरवेळी आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
२०२५ च्या शैक्षणिक सत्रापासून SBC साठी २% स्वतंत्र आरक्षण लागू करावे. विणकरांचे आर्थिक विकास महामंडळ सुरू करून संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी.यंत्रमाग महामंडळावर तज्ज्ञ विणकरांची नियुक्ती करण्यात यावी.SBC विद्यार्थ्यांना राज्यशासनाच्या योजनांसाठी SBC प्रमाणपत्र व केंद्र शासनाच्या योजनांसाठी OBC प्रमाणपत्र द्यावे.SBC विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत. अशा पाच प्रमुख मागण्यांसाठी शिरस्तेदार संजय काटकर यांना देण्यात आले.यावेळी सुनील मेटे,राहुल लाटणे,सुनिल कांबळे, महमद जमादार, सुप्रिया मजले,नागेश क्यादगी, बाबासो मकानदार, सुनिता पाटील,अरूण जाधव,श्रीमंत बागडे,ज्योती लाटणे, श्रीनिवास फुलपाटी,अरविंद चौगुले,गीता कुरंदवाडे, अशोक मगदूम व समाजबांधव सहभागी झाले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800