लिंगायत समाजातील सर्वानी एकत्र येणे काळाची गरज-अशोक स्वामी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लिंगायत समाजातील सर्वानी एकत्र येणे काळाची गरज-अशोक स्वामी.

इचलकरंजी:
 हाताची ५ बोटे एकसारखी नसली तरी जेवण करताना सर्व बोटे एकत्र येऊन मुखात जातात. त्या बोटाप्रमाणे विरशैव लिंगायत समाजातील विविध जाती, धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले.नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्यावतीने आयोजित समाजबांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते.
        समाजातील महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने या बैठकीस प्रारंभ झाला. सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी लिंगायत समाजातील विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणुन त्यांना एकसंघ करणे, त्यांची उन्नती साधणे आणि प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. विजय हावळे, गजानन आंबी, शिवपुत्र चौगुले, भाणुदास तासगावे, आण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबुत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त करत संघटनेने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच समाजाचे उत्कृष्ठ आणि सर्वसुविधांनी युक्त मंगलकार्यालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.
       वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सद्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहे. मात्र त्यांचे कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठीच सुुरु असल्याचे दिसून येते.याबाबत समाजबांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे. जुन्या मंडळाच्या निवडीवेळी समाजातील युवक आणि प्रतिष्ठिताना डावलले.समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे. मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच नवीन विरशैव उत्कर्ष लिंगायत संघटना स्थापन्याचा विचार पुढे आला.त्यामुळे समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडेच जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी, समाजाच्या विकास कामांसाठी वापरुया. समाजाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच समाजातील युवक व महिलांसाठी उद्योग, व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
       बैठकीस माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शिवगोंड पाटील, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजगोंड पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, वीरशैव बँकेचे संचालक सुनिल पाटील, शिवबसु खोत, सुनील तोडकर, सुकुमार पाटील, स्मिता तेलनाडे, सारीका तेलनाडे, बाबु पनोरी, शशिकांत नेजे, सदा मलाबादे, नागेंद्र पाटील, भारत मुरदुंडे, सुप्रिया मजले, गीता कुरुंदवाडे, सुवर्णा स्वामी, उषा दरिबे, संजिवनी उरणे, सविता हिंगमिरे, अमृता पाटील, स्वाती पाटील, विलास पाटील, दर्‍यापा परीट, प्रविण पाटील, अरुण कुंभार, विठ्ठल तोडकर (इंजि.), सचिन पाटील, सुशांत कोटगी, रमेश चनविरे, महादेव बन्ने, अनिल चचडी, सुभाष घुणकी, प्रशांत बुढे-पाटील, अनुप शेटे, राजु तेरदाळे, अ‍ॅड. किशोर हावळे, सचिन कोरे, राजु कोरे, दिपक स्वामी, शंकर बिल्लुर, सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन शिवकुमार मुरतुले यांनी केले तर उमेश पाटील यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More