कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुरुष गटात शिवमुद्रा कौलव तर महिला गटात जय हनुमान बाचणी अजिंक्य
इचलकरंजी
जयहिंद मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात शिवमुद्रा कौलव या संघाने तर महिला गटात जय हनुमान बाचणी या संघाने अजिंक्यपद मिळविले. तर बालशिवाजी शिरोळ व हिरण्यकेशी आजरा यांना अनुक‘मे उपविजेते पद मिळाले.
जयहिंद मंडळाच्या मैदानावर तीन दिवस कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटातून ३० तर महिला गटातून १७ संघ सहभागी झाले होते. बाद पध्दतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवत पुरुष गटात शाहू सडोली, शिवमुद्रा कौलव, बालशिवाजी शिरोळ आणि जयहिंद इचलकरंजी या संघांनी तर महिला गटात हिंदवी कौलव, जय हनुमान बाचणी, हिरण्यकेशी आजरा व व्हीकेसीपी कार्वे या संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. पुरुष गटात उपांत्य फेरीत शाहू सडोली विरुध्द बालशिवाजी शिरोळ ही सुरुवातीला अटीतटीची ही लढत शिरोळ खेळाडूंच्या आक‘मक खेळीने एकतर्फी झाली. ही लढत बालशिवाजी संघाने ३१ गुण मिळवत सडोली संघावर (१७) १४ गुणांनी मात करत अंतिम फेरी गाठली. तर शिवमुद्रा कौलव विरुध्द जयहिंद इचलकरंजी यांच्यातील सामना हा पूर्णत: एकतर्फी झाला. सुरुवातीपासून शिवमुद्रा संघाने जयहिंद संघावर वर्चस्व राखले होते. यामध्ये शिवमुद्रा संघाला २९ तर जयहिंद संघाला ८ गुण मिळाले आणि २१ गुणांनी विजय मिळवत शिवमुद्रा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
तर महिला गटात हिंदवी कौलव विरुध्द जय हनुमान बाचणी हा सामना चांगलाच रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंच्या आक‘मक खेळीने निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी ५ चढाया देण्यात आल्या. त्यामध्ये बाचणी संघाने कौलव संघाचा ४ गुणांनी पराभव केला. व्हीकेसीपी कार्वे विरुध्द हिरण्यकेशी आजरा यांच्यातील लढत अटीतटीची झाली. विजयाचे पारडे सातत्याने दोन्ही बाजूकडे झुकत होते. अखेर हिरण्यकेशीने कार्वे संघावर ४ गुणांनी मात करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पुरुष गटातील बालशिवाजी शिरोळ विरुध्द शिवमुद्रा कौलव यांच्यातील सामना रंगतदार झाला. पहिल्या डावात शिरोळ संघाने घेतलेली आघाडी दुसर्या डावात पिछाडीवर टाकत कौलव संघाने विजयावर शिक्कामोर्तब करत अजिंक्यपद पटकविले. शिरोळ संघाला २२ तर कौलव संघाला २९ गुण मिळाले. महिला गटातील जय हनुमान बाचणी विरुध्द हिरण्यकेशी आजरा यांच्यातील लढत ही एकतर्फीच झाली. बाचणी संघाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत आजरा संघाला चांगलेच जखडून ठेवले. बाचणी संघाने ३४ गुण मिळवत आजरा (१७) संघाला १७ गुणांनी पराभूत करुन अजिंक्यपदावर नांव कोरले. स्पर्धेदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, प्रकाशराव सातपुते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
विजेत्या संघांना जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतिश डाळ्या, स्पर्धा समिती स्वागताध्यक्ष शशांक बावचकर, श्रृती जमदग्नी, श्रध्दा बाळण्णावर, समीर बाळण्णावर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी उदय चव्हाण, बाळासाहेब कलागते, रमेश भेंडीगिरी, आण्णासाहेब गावडे, अजित पाटील, उमा भेंडीगिरी, शेखर शहा, अहमद मुजावर, भूषण शहा, दिलीप ढोकळे, राहुल खंजिरे, अमित कागले, अनिल डाळ्या, अमित कागले, रुपेश जाधव, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत पाटील, राजेंद्र चौगुले, शंकर पोवार, प्रविण फाटक, सुनिल सुतके, सदाशिव कित्तुरे, सतिश मेटे,पोपट सातपुते, सुहास गोरे, मनोहर वडीगे, देवेंद्र बिरनाळे, अमर भिसे, तुषार जगताप, नंदु भोरे आदींसह जयहिंदचे पदाधिकारी, खेळाडू व क्रीडारसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मु‘याध्यापक शंकर पोवार यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800