अर्थसंकल्पाचे पॉवरलूम असोसिएशनकडून स्वागत
सन २०२५ – २६ सालासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन स्वागत करीत आहे.
या अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योग विभागामध्ये तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे टेक्नीकल टेक्सटाईलसाठी महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करणेत आली आहे. यामुळे सध्या मागणी असलेल्या नव्या टेक्नीकल टेक्सटाईल विभागास चालना मिळणार आहे. या मिशनमधून टेक्नीकल टेक्सटाईल मधील संशोधन, उत्पादन व वापर तसेच त्याचा उपयोग यामध्ये शोघ व त्याची उपयोगिता यासाठी भरीव तरतूद करणेत आली आहे. त्याचबरोबर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने मागणी केलेप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे खास लक्ष देणेचे सरकारने ठरविले आहे. कापसाच्या उत्पादनामध्ये एकरी वाढ होणेसाठी व चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादनासाठी सरकारने पावले उचलली आहेत ही वस्त्रोद्योग उद्योगासाठी आशादायक बाब आहे. सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी नविन धोरण लवकरच जाहीर होणार आहे. याचाही लाभ वस्त्रोद्योगास होईल. वस्त्रोद्योग विभाग सन २०२५ – २६ साठी ७७४ कोटींचा अतिरिक्त निधी प्रस्तावित केलेला आहे. त्याचबरोबर यंत्रमाग उद्योगाला दिली जाणारी वीज सवलत अर्थखात्याने परवाच महावितरण कंपनिला अतिरिक्त निधी दिल्यामुळे यापूढेही निर्वीरतपणे सुरू रहाणार आहे. उद्योजकांमध्ये बँक व्यवहाराबाबत व खासकरून नेट बँकिंग व्यवहाराबाबत भितीचे वातावरण आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्हे घडू नयेत. उद्योजक व व्यापाऱ्यांच्या बँकेतील खात्यांच्या सुरक्षततेसाठी सायबर गुन्हे प्रतिबंध विभाग, नवी मुंबई येथे सुरू करत असून त्याठिकाणी अत्याधुनिक सायबर लॅब उभारली जाईल अशी घोषणा केली आहे. यामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मनातील भिती कमी होणेस मदत होणार आहे असे पत्रक दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800