विरांगणा सन्मान देऊन विधवा शब्द हद्दपार करा,विरांगना सन्मानाची व्यापक चळवळ राबवुया-राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश.६० विरांगणाचा सन्मान.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विरांगणा सन्मान देऊन विधवा शब्द हद्दपार करा,विरांगना सन्मानाची व्यापक चळवळ राबवुया-राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश.६० विरांगणाचा सन्मान.

 

इचलकरंजी
कोणत्याही धर्माच्या ग्रंथात विधवा शब्द नाही,विधवांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी सुरू केलेली विरांगना चळवळ व्यापक करण्याचे आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी केले.
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ इचलकरंजी व श्री. अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरस महिला शाखा यांच्या वतीने महावीर जैन भवन येथील आनंद दरबार येथे विरांगना सन्मान सोहळा पार पडला.यावेळी सर्वधर्मीय ६० महिलांचा विरांगणा स्वरूपात शाल व स्वागत माळ देऊन सन्मान करण्यात आला.
भगवान महावीर यांनी जगाला समानतेचा संदेश दिला,त्याचबरोबर महिलांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी आज जगभरात भगवान महावीरांचे विचार प्रेरक ठरत आहेत. जातीयवादाच्या भेदभावापेक्षा आज स्त्रियांना दिली जाणारी वागणूक दुःख देणारी असल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित विरांगना महिलांपासून सुरू झालेली ही मालिका जिल्हाभर राबवा,शुभ कार्यात महिलांना सामावून घ्या असे आवाहन करताना त्यांनी ही चळवळ व्यापक करण्याचे आवाहन केले.यावेळी जैन कॉफ्रेंन्सच्या पदाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल उगमचंदजी गांधी,जीवनराजजी पुनमिया,पद्मजा चंगेडिया,हेमा चोपडा,शुभांगी गुगळे यांचा सन्मान करण्यात आला.
सत्कार सोहळ्यासाठी  श्री.वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष रमेश जैन,माजी अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया,उपाध्यक्ष राहुल बोरा,सेक्रेटरी जयंतीलाल सालेचा,सहमंत्री घिसुलाल पारख,ट्रस्टी संजय गुगळे,दिपक बेदमुथा,राजेश भंडारी,भरत बोहरा,अभिजित पटवा तसेच कॉन्फरन्स पदाधिकारी महावीरजी बोरुंदिया,विजयराजजी बोरा,मंजु भन्साळी,पद्मजा चंगेडिया,हेमा चोपडा,शुभांगी गुगळे,वैशाली बोरा,सुवर्णा बोरा,श्वेता सुरपुरीया उपस्थित होते.
विरांगना महिलांचे कार्य प्रेरणादायी-सौ.पद्मजा चंगेडिया.
विरांगना महिलेस कुटुंबाचे आई व वडील या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात,त्यावेळी करावा लागणाऱ्या संघर्षातून त्यांच्या कार्याची प्रचिती येते,त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
सौ.पद्मजा चंगेडिया, प्रांतीय उपाध्यक्ष अ.भा.स्था.जैन.कॉफ्रेंन्स
 विरांगनांचे महत्व अधोरेखित करणार.-रमेश जैन.
विरांगना यांच्याबाबत सुरू केलेला उपक्रम समाजहिताचा असून राष्ट्रसंत कमलमुनी म.साब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शुभ कार्यात विरांगणाना स्थान देण्यात येईल.
रमेश जैन.अध्यक्ष श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ.इचलकरंजी.
महिलांच्या सन्मानात आश्वासक पाऊल-रत्नमाला गांधी.
विरांगना उपक्रमामुळे महिलांना एक मानसिक आधार मिळाला असून महिलांचे ठिकठिकाणी होणारे खच्चीकरण थांबून महिलांच्या सन्मानात एक आश्वासक पाऊल उचलले गेले आहे,सर्वत्र याची अंमलबाजावनी व्हावी याकरिता प्रयत्न करणार आहे.
रत्नमाला बबन गांधी,माजी उपनगराध्यक्ष, इचलकरंजी नगरपालिका.,संचालक पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More