इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा दि.१० मार्च ते १२ मार्च या कालावधीत आयुक्त पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अनुषंगाने दि.१० मार्च रोजी इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे महिला सफाई कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले.
त्याचबरोबर दि. ११ आणि १२ मार्च रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून करणेत आला.स्पर्धां आणि त्यामधील विजेत्या महिला खालील प्रमाणे –
१) रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक – निलम चौगुले
द्वितीय क्रमांक – गौरी गवते
तृतीय क्रमांक – रोमा चौगुले
उत्तेजनार्थ – आरती रास्ते
२) पाककला स्पर्धा
प्रथम क्रमांक – करीश्मा रागवाणी
द्वितीय क्रमांक-सरोजनी खंडागळे
तृतीय क्रमांक – गीता भागवत
उत्तेजनार्थ – प्रिया मगदूम
३) नृत्य स्पर्धा मुली (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक – विभागुन
अनुष्का भंडारे, निकीता लालबेग
द्वितीय क्रमांक – श्रद्धा बडवे
तृतीय क्रमांक – श्रुती नाईक
४) मेहंदी स्पर्धा
प्रथम क्रमांक – गौरी वीर
द्वितीय क्रमांक – रोमा व्हटकर
तृतीय क्रमांक -मृणाल आलुगडे
उत्तेजनार्थ – निकीता दळवी
५) वकृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक – सानिका दाडमोडे
द्वितीय क्रमांक – मेघा उत्तुरे
तृतीय क्रमांक – दिपमाला माने
उत्तेजनार्थ – मुग्धा ढोकळे
उत्तेजनार्थ – शारदा कडोलकर
६) नृत्य स्पर्धा महिला (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक –
प्राजक्ता गोकुलकर
द्वितीय क्रमांक -जान्हवी पोळ
तृतीय क्रमांक – विभागुन
शितल पाटील, कविता सोळंकी
उत्तेजनार्थ – पद्मा लालबेग
७) होम कंपोस्टींग प्रकल्प स्पर्धा
प्रथम क्रमांक – स्नेहल सातपुते
द्वितीय क्रमांक -स्नेहा मिनेकर
तृतीय क्रमांक – संगिता सातपुते
८) गृप नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक -सुनिल पोवार गृप
द्वितीय क्रमांक – थिम नृत्य दर्पण
तृतीय क्रमांक -ओंकारेश्वर गृप
उत्तेजनार्थ – सखी मंच गृप
उत्तेजनार्थ – ॲचिव्हर गृप
९) स्वच्छ शहर होम मिनिस्टर स्पर्धा
प्रथम क्रमांक – अर्चना आवळेकर
द्वितीय क्रमांक – मेघा उत्तुरे
तृतीय क्रमांक – स्मिता अनंतपुरे
चतुर्थ क्रमांक – जयश्री डाके
पाचवा क्रमांक – सुरेखा सातपुते
या स्पर्धेचा प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण समारंभ आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
महिला महोत्सवाचा समारोप सुमित डान्स ॲकॅडमी प्रस्तुत ‘जागर स्त्री शक्तीचा’ या नृत्य विष्काराच्या कार्यक्रमाने झाला.
यावेळी प्र.उपायुक्त रोशनी गोडे,प्र.उपायुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, ग्रंथपाल बेबी नदाफ, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, माजी नगरसेविका धृवती दळवाई, शुभांगी माळी, माधुरी चव्हाण , सुनिता शेळके, रुपाली कोकणे यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच महिला महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी शहरातील महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
महिला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजनासाठी महिला बाल विकास विभाग प्रमुख सिमा धुमाळ यांचेसह महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी तसेच शहर समन्वयक प्रविण बोंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800