इचलकरंजीत कारखान्यात चोरी – सहा जणांना अटक, २ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त,२४ तासात छडा
इचलकरंजी:
शहरातील खंजिरे औद्योगिक वसाहतीत कारखान्यात चोरी करणाऱ्या सहा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी१) सुरज महादेव पाटील (वय २७, रा. गणेशनगर)२) गणेश सुरेश आडेकर (वय २८, रा. गणेशनगर)३) शैलेश संभाजी कुंभार (वय २९, रा. तारदाळ)४) राजू मारुती वडर (वय ३२, रा. भाटले मळा)५) सद्दाम इसाक सुतार (वय २२, रा. दत्तनगर)६) ऋषिकेश बाबासाहेब पाटील (वय २५, रा. दत्तनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूर औद्योगिक वसाहतीत मनोज शिवाजी लोखंडे (वय ३८, रा. सोलगे मळा, इचलकरंजी) यांचे “वर्षा इंडस्ट्रीज” नावाचे वर्कशॉप आहे. दिनांक १४ मार्च रोजी या कारखान्यातून १ लाख १२ हजार रुपयांचे व्हीएमसी मशिनचे आऊटर रेसचे ५६ नग चोरीला गेले होते.या प्रकरणी लोखंडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेला माल विक्रीसाठी काही संशयित येणार आहेत.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.चौकशीअंती त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ५६ नग चोरी केलेला माल, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (क्रमांक एमएच ०७ एस ५४२३) आणि दुचाकी (क्रमांक एमएच ०९ एफएम ०८५६) असा एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहापूर पोलिसांनी वेगवान तपास करून चोरीचा छडा लावल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800