जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या जन्मदिनी विविध सामाजिक उपक्रम उत्साहात.
इचलकरंजी :
नेहमी लोकोपयोगी उपक्रम राबवून जनतेचे हित जोपासणारे शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा वाढदिवस इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
प्रारंभी पन्हाळा येथील शिव मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी छत्रपती प्रतिष्ठान प्रमुख संतोष कांदेकर, तालुका प्रमुख दादासाहेब तावडे, पन्हाळा शहर प्रमुख मिलिंदजी नाईकवडी, कामगार सेना तालुका प्रमुख महादेव पाटील, उपतालुका प्रमुख चंद्रकांत यादव, विभाग प्रमुख संतोष जगदाळे व सर्व शिवसैनिक व शिवभक्त उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी येथील चाणक्य अंत्यसंस्कार संस्थेला 51 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. सदरचा निधी चाणक्य अंत्यसंस्कार सेवा सेवा संस्थेचे प्रमुख जवाहर छाबडा यांनी स्विकारला. सामाजिक भावनेने दिलेला हा निधी जनमाणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याचे गौरवोद्गार छाबडा यांनी यावेळी काढले. याप्रसंगी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक वसंतराव माने, ग्यानचंद जैन, शशिकांत मोहिते, मा.नगरसेवक प्रकाश पाटील, ॲड.राजकुमार निर्मळे, विनायक काळे यांची प्रमुख उपस्थित होती.
येथील गावभाग अवधुत आखाडा येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यात 0 ते 14 वयोगटातील सुमारे ३०० बालकांची मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक सल्ला व औषधोपचार करण्यात आले. तसेच डोळे तपासणी शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी करुन २५ जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच २५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिता पाटील, डॉ.कौस्तुभ भोकरे, डॉ.अमितकुमार हातुंजे, डॉ.अमेय काजवे, फार्मासिस्ट रामप्रसाद उरुणकर, कर्मचारी जमेला घुणके, राणी रजपुत, शोभा गिरीबुवा, भाग्यश्री सुतार यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी विलासराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर नवचैतन्य बालगृह इचलकरंजी येथील चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बालगृहातील बालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना इचलकरंजी शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, उपशहरप्रमुख विनायक सुर्यवंशी, उपशहरप्रमुख विकास जगताप, उपशहरप्रमुख संदीप थोरात, उपशहरप्रमुख प्रताप मस्के, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अमर गेजगे अमर गेजगे, सचिन नागने, महेश चोपडे, विद्या राकेश जाधव, वैशाली सुनिल शिंदे, भारती तराळ, आरती वायचळ, शांता खोत, सरस्वती कोष्टी, वैशाली तराळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दलितमित्र काकासाहेब माने क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, जनरल कामगार संघटना इंटकचे उपाध्यक्ष अविनाश मोरे, मा.तरु कमिटी सदस्या मिनाताई मोरे यांच्यावतीने विद्यार्थी विकास प्रबोधिनी अब्दुललाट संचलित बालोद्यान येथील अनाथ, निराधार मुलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
इचलकरंजी शहर शिवसेना, एक्सनोरा ग्रुप व एस.के.प्रेमी यांच्यावतीने मोठे तळे येथे मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले. तसेच जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इचलकरंजी संचालित सन्मती बौद्धिक अक्षम मुलांची शाळा (अनिवासी) आणि सन्मती व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र इचलकरंजी येथे जिल्हाप्रमुख रविंद्र माने साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच इचलकरंजी शहर शिवसेना, रविंद्र माने साहेब प्रेमी, टर्निंग पॉईंट फाऊंडेशन व रविंद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने खाऊ व फळे वाटप करण्यात आले.
यानंतर लिंबू चौक, इचलकरंजी येथील समाधान वृद्धाश्रमास अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. इचलकरंजी शहर शिवसेना, रविंद्र माने साहेब प्रेमी, टर्निंग पॉईंट व रविंद्र माने युथ फोर्स यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.रुपालीताई संजय चव्हाण तसेच गणपती हौद अभिनंदन युवक मंडळ यांच्यावतीने सांगली वेस मारुती मंदिर येथे लाडु वाटप करण्यात आले.
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपशहरप्रमुख उमाताई जाधव, मिनाताई भिसे, कबनूर शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख राजश्रीताई यादव, विभागप्रमुख चित्राताई दुधाणे, सोनालीताई आडेकर, विनायक यादव, हिंदूराव आडेकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमांसाठी विनायक काळे, ॲड .राजकुमार निर्मळ, संदिप माने, दिपक जगताप, प्रकाश नलवडे, संजय जगताप, संजय चव्हाण, हेमंत कांबळे, रमेश काळे, आनंदा खोंद्रे, किशोर कोरे, विनायक यादव, मिलिंद दादा पोवार, रणजित सावंत, प्रकाश ननवरे, अब्बु मिस्री, जितेंद्र निर्मळ, यश खैरमोडे, गौरव कांबळे, आयन रमदान, चंद्रकांत रवंदे, इलाई किल्लेदार, पिंटू कोळी, अमोल सुर्यवंशी, अल्लाबक्ष मुल्ला, ओंकार घोरपडे, अमित लिपारे, अमित शिरगुरे तसेच एक्सनोरा ग्रुप व एस.के.प्रेमीचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800