संगानियो लाभार्थी १५ दिवसात नोंदणी,इंदिरा गांधी रुग्णालयात ८ दिवसातून एकदा अपंगत्व दाखला मिळणार-आ.राहुल आवाडे
इचलकरंजी:
संजय गांधी निराधार योजना समितीच्या 22 फेब्रुवारी 2024, 8 जुलै 2024 व 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मंजूर 6213 लाभार्थ्यांचे पंधरा दिवसात डीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी करुन त्यांना मंजूर तारखेपासूनचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत. तर लाभार्थ्याचे खाते ज्या बँकेत आधार लिंक आहे त्याच खात्यावर अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस अपंगत्वाचे दाखले देण्याबाबतही सूचना केल्या आहेत.
आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहर व परिसरातील संजय गांधी निराधार योजनामधील लाभार्थ्यांना दिले जाणारे अर्थसहाय्य, उत्पन्न दाखला यासह विविध अडचणी संदर्भात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. त्यामध्ये बहुतांशी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर तहसिलदार सुनिल शेरखाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार राहुल आवाडे यांनी सुरुवातीला संगांयो लाभार्थ्यांना भेडसावणार्या समस्या, निर्माण झालेल्या अडचणींसह इचलकरंजी संगांयो कार्यालयात आवश्यक स्टाफ तातडीने भरण्यातबाबत मागणी केली. तसेच लाभार्थ्याला एकाच बँकेत खाते उघडण्यास सक्ती करण्याऐवजी त्याचे खाते ज्या बँकेत आधार लिंक केलेले असेल त्याच खात्यात जमा करण्याबाबतही मागणी केली.
यावेळी संगांयो इचलकरंजी समितीच्या 22 फेब्रुवारी, 8 जुलै व 10 ऑक्टोबर 2024 या तीन बैठकांमध्ये 6213 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. परंतु अद्यापही या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य प्रलंबित असल्याच्या प्रश्नावर मंत्री झिरवाळ यांनी या सर्व लाभार्थ्यांची तातडीने डीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी करण्यात यावी. आणि त्यांना तातडीने मंजूर तारखेपासून फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले. संगांयो लाभार्थ्यांनाही उत्पन्नाची अट लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर करण्यात यावी यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले उत्पन्नाचे दाखले तातडीने देण्यात यावेत, असे आदेशही मंत्री झिरवाळ यांनी दिले.
अपंगत्वाच्या दाखल्यासाठी लाभार्थ्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात जावे लागते. मात्र आता इचलकरंजीत शासनाने उपजिल्हा रुग्णालय असल्याने सदरचे दाखले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात देण्यात यावेत, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली. त्यावर मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तातडीने कार्यवाही करत आठवड्यातून एकदिवस इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अपंगत्वाचे दाखले देण्याबाबत सूचना केल्या. तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत लाभार्थ्याला सध्या 20 हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये वाढ करुन ते 50 हजार रुपये करण्याची आणि संगांयो विधवा लाभार्थ्यांसाठी मुलाचे वय 25 वर्षाची अट रद्द संदर्भात सविस्तर माहितीचा अध्यादेश नव्याने जारी करण्याचीही मागणीही करण्यात आली.बैठकीस महेश पाटील, अनिल डाळ्या, संजय केंगार, कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, संजय नागुरे, प्रमोद बचाटे, सतिश पंडीत आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800