श्री.ए.आर.तांबे सरांचे यश जिल्ह्याला भूषणावह-पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, एकसष्टी सोहळा उत्साहात संपन्न.
कबनूर
“श्रद्धा इन्स्टिट्यूशनच्या अद्ययावत व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच इचलकरंजी या वस्त्रनगरीत शिक्षण घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा ओघ वाढलेला आहे.हे श्री.ए.आर.तांबे सरांचे मोठे यश आहे.ते जिल्ह्याला भूषणावह आहे.त्यामुळेच मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. इचलकरंजी प्रशासकीय अधिकारी बनवण्याचे शहर व्हावे” असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
इचलकरंजीतील श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटेशन्सचे संस्थापक अध्यक्ष ए.आर.तांबे सर यांच्या एकसष्ठीनिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.माजी खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार सुरेशराव हळवणकर,आमदार राहुल आवाडे,माजी आमदार राजूबाबा आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“अतिशय आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून श्री.तांबे सरांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे.ते आदर्शवत व दिशादर्शक आहे.” असे सांगून पालकमंत्री नामदार अबिटकर म्हणाले,” तांबे सरांनी श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून डॉक्टर व इंजिनियर मोठ्या प्रमाणात बनवले.आता त्यांच्यावर आयएएस अधिकारी बनवण्याची जबाबदारी आहे.”
अभिषेक तांबे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ए.आर.तांबे सरांच्या ‘श्रद्धा क्लास ते श्रद्धा इन्स्टिट्यूशन्स’गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला.पीपीटीद्वारे श्री.तांबे सरांचा जीवनपट दाखवण्यात आला.पालकमंत्री नामदार आबिटकर यांच्याहस्ते ए.आर.तांबे व त्यांच्या धर्मपत्नी राजश्री तांबे यांचा सत्कार करण्यात आला.’शैक्षणिक मुद्रा’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले.
माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, “ए.आर.तांबे सरांनी भान ठेवून शैक्षणिक योजना आखल्या व बेभान होऊन त्या अमलात आणल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवले.”
माजी आमदार सुरेशराव हळवणकर,आमदार राहुल आवाडे,माजी आमदार राजूबाबा आवळे, ए.आर.तांबे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रवींद्र माने,अशोक स्वामी,सपना आवाडे,प्रकाश दत्तवाडे,डी.एम.कस्तुरे,जयकुमार कोले,अमृत भोसले,माजी शिक्षणाधिकारी बी.बी.भंडारे,विजय राजापुरे,श्रीकांत तांबे,अक्षय तांबे,निवास फराकटे, रवी अचलकर,सचिन कलश,एच.ए.पाटील, सुप्रिया कौंदाडे,संगीता पवार आदी उपस्थित होते. संतोष आभाळे यांनी सूत्रसंचालन केले.संजय कोले यांनी आभार मानले.सकाळचे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा,उपसरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके आदीसह अनेक मान्यवरांनी ए.आर.तांबे सरांना एकसष्ठीनिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
फोटो-
इचलकरंजी- येथील श्रद्धा इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक अध्यक्ष ए.आर.तांबे यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सत्कार करताना नामदार प्रकाश आबिटकर शेजारी सुरेशराव हळवणकर, संजयकाका पाटील,राहुल आवाडे,राजूबाबा आवळे आदी.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800