आधार गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

इचलकरंजी –
इचलकरंजीत धार्मिक सलोखा राखण्यात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे. आपल्या धर्माचा अभिमान बाळगत इतर धर्मांचा सन्मान करणं काय असते हे संपूर्ण राज्याला इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने दाखवून दिले आहे. समाजातील एकता, अखंडता कायम टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची आजही नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी केले. त्याचबरोबर या संस्थेला क वर्ग मिळण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करु. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने आधार गौरव पुरस्कार प्रदान व आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी आमदार हाळणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष फैयाज गैबान होते. सर्वजण सण साजरा करत असताना गोरगरीबांच्या घरातही ईद साजरी व्हावी यासाठी आधार परिवाराने खीर साहित्य देऊन त्यांना खर्या अर्थाने आधार दिला असल्याचे श्री. हाळवणकर यांनी सांगितले.
कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न कार्यक्रमात यावर्षी संस्थेच्यावतीने बापूसो गौसनबीसो ढालाईत (सामाजिक क्षेत्र), अॅड. इरफान एम. जमादार (न्याय क्षेत्र), डॉ. मारुफ युसूफ हिरोली (वैद्यकिय क्षेत्र), शहानूर वहाब कमालशहा (शैक्षणिक क्षेत्र) आणि राजू सरदार नदाफ (कला क्षेत्र) यांची ‘आधार गौरव’ तर बद्रेआलम मिरासाब देसाई यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या चंदूर येथील कु. राबिया महंमद मकुभाई हिला विशेेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्वागत आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबुब मुजावर यांनी केले. प्रास्ताविकात आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. परवेज गैबान यांनी बैतुलमाल कमिटीच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले. आभार फरीद मुजावर यांनी मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, मन्सुर मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्यक्ष हारुण पानारी, महिला मंडळ अध्यक्षा सौ. साजिदाबानू मुजावर, माजी नगरसेविका सौ. बिलकिस मुजावर, सौ. ताहिरा गैबान, सौ. रेश्मा शिरगांवे, युसूफ तासगांवे, फारुक आत्तार, रफिक मुल्ला, सलीम ढालाईत, जकीअहमद, फरहान मुजावर, रिफत मगदूम, फैय्याज पानारी, इम्रान तासगांवे, मौलाना अब्दुलरज्जाक सावनुर, ग्रंथपाल रिजवाना गैबान आदी उपस्थित होते.
आधार संस्थेतर्फे खीर वाटप करताना सुरेश हाळवणकर, विठ्ठल चोपडे,लतीफ गैबान व इतर
आधार गौरव पुरस्कार प्रदान करताना करताना सुरेश हाळवणकर, विठ्ठल चोपडे,लतीफ गैबान व इतर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800