सुळकुड योजना रद्द झालेली नाही,इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनस्तरावर मोठा निधी उपलब्ध-आ.राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुळकुड योजना रद्द झालेली नाही,इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनस्तरावर मोठा निधी उपलब्ध-आ.राहुल आवाडे

इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून, लवकरच यासंबंधीच्या महत्त्वाच्या कामांना सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मा.आ. सुरेश हाळवणकर यांनी प्रशासनाच्या कामावर समाधानी नसून इचलकरंजी शहराच्या पाणीयोजनेस विरोध करण्याची सुरू झालेली फॅशन प्रशासनाने कडक पावले उचलून मोडून काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना राहुल आवाडे यांनी पंचगंगा जॅकवेल परिसरातील पाणी उपसा क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत नागरी दलितेतर सुधार योजनेतून ३०० अश्वशक्तीच्या पंपाचे बसविणे, ८०० के.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि जलशुद्धीकरण केंद्रात १२५० के.व्ही.ए. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. यासाठी ४.३९ कोटी रुपये मंजूर झाले असून, यामुळे शहराच्या पाणी उपसा क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कट्टीमोळा जॅकवेल परिसरातील विद्युत वाहिनी नव्याने टाकणे, VFD स्टार्टर बसविणे आणि सुरक्षेसाठी CCTV लावणे या कामांसाठी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे दररोज ९ द.ल.लि. पाणी उपसा करणे शक्य होणार आहे.२०१९ च्या महापुरात झालेल्या नुकसानीनंतर विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मजरेवाडी जॅकवेलकडे ३३ के.व्ही. उच्चदाब वीजवाहिनी बसवली जाणार आहे. यासाठी ७७ लाख रुपये मंजूर झाले आहेत त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर दुसऱ्या लाईनमधून वीजपुरवठा जोडण्यात येणार आहे.नगरोत्थान महाभियान जिल्हास्तरांतर्गत जलशुद्धीकरण केंद्रात ९ लाख लिटर क्षमतेचे संप व पंप हाऊस उभारणीचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच बस-बार पॅनेल आणि EOT क्रेन बसविणेही हाती घेण्यात आले आहे. यासाठी ८९ लाख रुपये निधी मंजूर आहे. पंचगंगा नदी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी दाबनलिका बदलण्यासाठी योजनेच्या पाईपलाइनमधील १५०० मीटर भाग खराब झाल्याने त्याऐवजी नवीन पाईपलाइन टाकली जाणार आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
 शहरातील विविध  ७३ कूपनलिका विहिरींवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून,यासाठी १.३० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान २०२३-२४ अंतर्गत ६ उंच पाण्याच्या टाक्या उभारणी प्रकल्प,शहरातील पाणी वितरण सुधारण्यासाठी ६ नवीन उंच पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी ३१.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.नवीन उभारल्या जाणाऱ्या ६ पाण्याच्या टाक्यात  पी. बा. पाटील मळा,शांती नगर,दत्त मंदिर जवळ,जुना चंदूर रोड,तोरणा नगर,तुळजाभवानी नगर येथे ७ एमएलडी पाणी साठा होणार आहे अशी माहिती आ.राहुल आवाडे यांनी दिली. शहरातील पाणीपुरवठा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या सर्व योजनांची अंमलबजावणी तातडीने केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी अमृत भोसले,प्रकाश दत्तवाडे,प्रकाश मोरे,बाळासाहेब कलागते,दीपक सुर्वे,जयेश बुगड, शेखर शहा,राजू बोंद्रे,संजय केंगार, सतीश पंडित,दीपक पाटील, नरसिंह पारीक उपस्थित होते.
सुळकुड योजना रद्द झालेली नाही-
सुळकुड योजना रद्द झालेली नसून २०२३ मध्ये धरणाची गळती काढण्याचे काम सुरू असल्याने कमी झालेला पाणीसाठा व पाऊस लांबल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली,धरणाच्या गळती काढण्याचे काम सुरू असून त्यानंतर  धरणात ६ टीएमसी पाणी साठा वाढणार आहे त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना सुळकुडबाबत कोणतीही माहिती नाही तसेच ते शासन स्तरावर असलेल्या कोणत्याही बैठकीस उपस्थित नव्हते  अशी माहिती आ.राहुल आवाडे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणी नियोजन बैठक.
शहरातील पाणीप्रश्नाचा अनुभव असणाऱ्या इचलकरंजी नागरिक मंच सारख्या सामाजिक संस्था व अनुभवी लोकप्रतिनिधी ना घेऊन पाणी व्यवस्थापन करणार व 
इचलकरंजी शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासक तथा जिल्हाधिकारी लवकरच बैठक घेणार आहेत व पाण्याचे व्यवस्थापन करणार आहेत असेही आ.राहुल आवाडे यांनी सांगितले.
नविन योजनेचा मुख्यमंत्री निर्णय घेणार.
आता सध्या मंजुरी मिळालेली कामे लवकर पुर्ण होतील पण भविष्याचा विचार करून शहराला नविन पाणीयोजना आवश्यक असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ तारखेच्या बैठकीत निर्णय घेणार आहेत असेही आ.आवाडे यांनी सांगितले.
फोटो-
भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना आ.राहुल आवाडे,मा.आ.सुरेश हाळवणकर, अमृत भोसले,प्रकाश दत्तवाडे,जयेश बुगड व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More