इचलकरंजी
इचलकरंजी येथे सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी पार पडला.
सायंकाळी मुख्य मार्गावरील भव्य रथोत्सव सोहळ्यात भन्साळी यांचा रथ प्रथम तर आदर्श बहु मंडळ यांच्या रथास द्वितीय क्रमांक मिळाला.
रथयात्रेत विविध १२ सजीव धार्मिक व सामाजिक देखावे करण्यात आले होते.
भगवान महावीर यांचा शांततेचा व एकतेचा संदेश जगप्रसिद्ध आहे.२६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त इचलकरंजी येथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या १५ दिवसापासून विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी आदिनाथ जैन मंदिर, गावभाग येथून प्रभात फेरी आयोजित केली होती.ही फेरी गुजरी पेठ,कागवाडे मळा,राजवाडा चौक,शांतिनाथ मंदिर,थोरात चौक, बालाजी चौक,शाहू पुतळा मार्गे जैन बोर्डिंग येथील चंद्रप्रभू जैन मंदिर येथे आल्यानंतर ध्वजारोहण झाले.
त्यानंतर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.इचलकरंजी नागरिक मंच प्रणित अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमात अन्नदान करण्यात आले,आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्या चपाती भाजी केंद्रात मिष्ठान्न वितरण करण्यात आले.
सकल जैन समाजाच्या वतीने एकत्रितपणे भगवान महावीर जन्म कल्याणिक महोत्सव करण्याची वेगळी परंपरा या शहरांनी जपली आहे. या परंपरेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
इचलकरंजी शहरात देशातील विविध भागातील जैन समाज स्थायिक झाला आहे. येथे समस्त जैन समाजाच्या १७ मंदिर व भवन यांनी १९७६ पासून माजी खासदार कल्लापाणा आवाडे दादा यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जैन धर्मीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, पाककला स्पर्धा,अष्ट द्रव्य थाळी सजावट स्पर्धा,ट्रेजर हंट ऑन व्हील स्पर्धा आणि रक्तदान शिबिर तर सायंकाळी जैन भजन स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा,प्रवचन असे रक्तदान शिबिर,बाहुबली येथील वृद्धाश्रमास शिधावाटप तसेच टीबी क्लिनिक येथील रुग्णांना दूध व बिस्कीट वाटप पार पडले. सकाळी सर्व मंदिरामध्ये जन्म कल्याणक महोत्सव त्याचबरोबर पालखी सोहळा ही पार पडला.
सायंकाळी सहा वाजता श्री १००८ भगवान महावीर रथोत्सव सोहळा सुरु झाला. यावेळी देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आलेला होते. जैन धर्मीय विषयावर व समाज प्रबोधनात्मक देखाव्यावर आयोजित या स्पर्धेत अनेक लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले होते. धार्मिक तसेच समाज प्रबोधनात्मक जिवंत देखाव्यातून अनेक संदेश देण्यात आले. गावभाग येथील जैन मंदिर मधून सुरू सुरू झालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन श्रावक व श्राविका सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत रथ व वाद्यपथकांचा समावेश होता. अनेक महिला विविध वेशभूषा करून या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
या मिरवणुकीमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, राहुल खंजीरे, स्वप्निल आवाडे उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सचिव उदय चौगुले यांच्यासह इचलकरंजी येथील जैन मंदिराचे अध्यक्ष गुंडाप्पा रोजे, ओमप्रकाश छाजेड,अजित खंजीरे, राजेंद्र शहा,ग्यानचंद पाटणी, प्रकाशचंद राठोड,प्रमोद भाई मेहता, रमेश जैन,रवींद्र पाटील,शेषराज पाटणी,अशोक बाफना, बाळासाहेब परीसा चौगुले,बाळासो पाटील, अनिल बमन्नावर,कुंतीलाल पाटणी, शशिकला बोरा यांचा सहभाग होता.
मिरवणूक नामदेव मैदान या ठिकाणी आल्यानंतर परितोषक वितरण करून विसर्जित करण्यात आली यावेळी पन्नास वर्षे या महोत्सवाला योगदान देणाऱ्या कुंतीलालजी पाटणी व प्रकाशजी पहाडिया यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन भगवान महावीर जन्मकल्याणक समितीच्या वतीने करण्यात आले.
शोभयात्रा
रथोत्सव
शोभायात्रेत सहभागी जैन समुदाय

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800