बांधकाम कामगार सुविधांपासून वंचित राहणार नाही-आ.राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम कामगार सुविधांपासून वंचित राहणार नाही-आ.राहुल आवाडे

इचलकरंजी –
केंद्र व राज्य सरकार हे कामगारांच्या बाजूने असून इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील एकही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविला जाईल. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे. त्याचबरोबर त्यांना हक्काचे घरकुल मोफत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत आणि आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून जीवित नोंदीत कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच पुरवठासाठी नोंदणी व टोकण देणे संदर्भातील कार्यक्रम राजीव गांधी भवन येथे पार पडला त्यावेळी आमदार आवाडे बोलत होते.
ते म्हणाले, इचलकरंजी ही औद्योगिकनगरी असून ते काळानुरूप बदलत आहे. औद्योगिकरण वाढत असले तरी कामगार व मालक यांच्यातील समन्वय व सामंजस्य यामुळे औद्योगिक शांतता टिकून आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांची संख्या मोठी असली तरी त्यांची जीवित म्हणजे कार्यरत नोंदणी कमी प्रमाणात आहे. नोंदणीशिवाय साहित्य मिळणार नसल्याने म्हणून सर्व कामगाराची नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी 17 एप्रिलपर्यंत ही नोंदणी केली जाणार असून कोणीही कामगार त्यापासुन वंचित राहणार नाही.  केंद्र व राज्यात आपले सरकार असून ते कामगारांचे आहे. त्यामुळे सर्व योजनाचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचविला जाईल, असे सांगितले. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी  मंडळाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन असेही ते म्हणाले.
स्वागत मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद पोवार यांनी केले. महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पोवार यांनी प्रास्ताविकात बांधकाम कामगारांच्या समस्या व अडचणी सांगत संघटना कामाचा आढावा घेतला. तसेच बांधकाम  कामगारांना योजनाचा लाभ मिळवून द्यावा असे सांगितले. या शिबिराचे नियोजन मुकुंद पोवार व प्रमोद पोवार, रमेश पाटील यांनी केले होते.
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमदार राहुल स्वतंत्र यंत्रणा  उभी  केली आहे. त्यामुळे कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही. बांधकाम कामगारांना घरकुल मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत हे घरकुल मोफत मिळावे म्हणून आम्ही पाठपुरावा करू. बांधकाम कामगारांनी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
 याप्रसंगी मिश्रीलाल जाजु, अमृत भोसले, बंडोपंत सातपुते, अनिल डाळ्या,  वृषभ जैन, मदन मुरगुडे, चंद्रकांत कोष्टी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विपुला  लोहार, मनीषा नाईक, संजय गेजगे मनीषा सिंग, सत्यजित निंबाळकर, शंकर नंदरगी, सोहेल शेख, मारुती कोरवी, बाळासाहेब कलागते, प्रशांत कांबळे, संजय केंगार, राजाराम बोंगार्डे, इम्रान मकानदार, राजू बोंद्रे, नितेश पोवार,  सतीश मुळीक, कोंडीबा दवडते, अनिल शिकलगार, राजू भाकरे, दीपक पाटील आदीसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More