मान्सुनपुर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच अतिक्रमण मोहीम कडकपणे राबवावी-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजी
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी मान्सूनच्या पार्श्व भूमीवर आवश्यक असलेल्या कामकाजाचा आढावा घेणेसाठी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.
या अनुषंगाने शहरातील सर्व सारण गटारी येत्या सात दिवसांत स्वच्छ करणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले. या कामी आवश्यक असलेली जे.सी.बी.,
डंपर, ट्रॅक्टर अशी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे च्या सुचना दिल्या. त्याचबरोबर या कामावर देखरेख करण्यासाठी महानगरपालिका वरिष्ठ अधिकारी यांचे पथक स्थापन करणेचे आदेश दिले.
त्याचबरोबर सद्यःस्थितीत सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम अत्यंत कडपपणे राबविण्याच्या सुचना अतिक्रमण विभागास दिल्या.
या बैठकीस सहा.आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, रेकॉर्ड कीपर सदाशिव गोनुगडे, गौस जमादार,मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुगकर, महादेव मिसाळ, रफिक पेंढारी, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800