आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी.
इचलकरंजी
सन २०१९ आणि सन २०२१ या सालामध्ये इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी महानगरपालिका प्रशासन, पूर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समवेत शुक्रवार दि.२ मे रोजी बैठक घेतली होती.
सदर बैठकीत ठरले प्रमाणे आज सोमवार दि.५ मे रोजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर आणि पुरक्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील शेळके मळा, बागवान पट्टी, स्वामी समर्थ मंदिर, मुजावर पट्टी, काळा ओढा परिसर, पि.बा.पाटील मळा माऊली मंदिर या संपूर्ण पुरक्षेत्राची पाहणी केली.
सदर पाहणी दरम्यान आयुक्त यांनी पूर्व क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पुर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुर परिस्थिती मध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
पुर परिस्थिती बाबतची सविस्तर समस्या, माहिती तसेच नागरिकांना पुर परिस्थिती मध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या नंतर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी याबाबत आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावणे च्या सुचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, पापालाल मुजावर, सहा आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, अभियंता बाजी कांबळे, सहा नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील, नितिन देसाई, अविनाश बन्ने, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, विजय पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक सचिन भुते, संग्राम भोरे,करण लाखे ,अनिल सुतार आदींसह पुर क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800