डीकेटीईचे कॉमर्स कॉलेज बारावी परीक्षेमध्ये पुन्हा जिल्ह्यात अव्वल
इचलकरंजी
फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या एच. एस. सी. बोर्ड-२०२५ परिक्षेमध्ये डीकेटीई च्या इंग्लिश मेडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील प्रथमेश चव्हाण याने ९८ टक्के गुणांसह जिल्हयात अव्वल तर राज्यात वाणिज्य शाखेमध्ये प्रथम असण्याची शक्यता आहे. तर यंदाही कॉलेजने कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.
कॉलेजमध्ये राशी नावंधर हिने ९६.८३ टक्के गुणांसह द्वितीय, स्वाती चव्हाण व अभिजीत जुधंळे या दोघांना अनुक्रमे ९६.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत. डीकेटीई कॉमर्स कॉलेजचा निकाल १०० टक्के l लागला आहे. सदर परिक्षेमध्ये राशी नावंधर, स्वाती चव्हाण, झलक सोमानी, श्रिया नादरेकर, अदित्य धापळे, दिव्या हिरूकडे, सुयश पाटील यांनी अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच २३ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त गुण मिळवुन उर्तीण झाले. कॉलेजची अंखड यशाची परंपरा याही वर्षी चालु राहिली. यासाठी कॉलेजच्या प्राचार्या सौ. भारती कासार, विभागप्रमुख जी.बी. खानाज सर व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे व रवि आवाडे, संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे व सर्व संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्याचे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800