ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप.

इचलकरंजी
शनिवार दिनांक २६ जुलै रोजी रोटरी भवन येथे रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशन इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त सहकार्याने समाजातील गरजू विद्यार्थी-वि‌द्यार्थ्यांनीना मोफत सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. श्री. यतीराजजी भंडारी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष श्री. घनश्यामजी सावलानिजी व संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख जुगलकिशोरजी तिवारी, हेमंत कवठे, सदाशिव काजवे यांनी करून दिले तर पाहुण्यांचा सत्कार गजाननराव सुलतानपुरे, डीएम बिरादार, शिवबसू खोत यांनी केला. उपस्थितांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सेक्रेटरी किरण कटके यांनी केले. प्रास्ताविकामध्ये क्लबचे अध्यक्ष श्री. सुनिल कोष्टी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करत आहोत. परंतु अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना सायकलची गरज आहे, परंतु आपण ती पूर्ण करू शकत नाही याची खंत व्यक्त केली. यावेळी प्रकाशराव सातपुते यांनी रोटरीच्या कामाचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. ज्यांनी ज्यांनी या कार्यास सहकार्य केले त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री. यतीराज भंडारी यांनी पुढील सहा महिन्यांमध्ये आपण परत एकदा गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करू, त्यासाठी आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे सहकार्य करू, असे आश्वासन दिले तर दुसरे अतिथी घनश्यामजी सावलानी यांनी रोटरी सेंट्रल व प्रोबस संयुक्तपणे कार्यक्रम राबवू, असे आश्वासन दिले. यावेळी लाभार्थी विद्यार्थी यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सायकली देण्यात आल्या त्यामध्ये कुमारी श्रावणी कांबळे, त्यसली मुजावर, ऋतुजा शेळके, श्लोक कदम, राधा देसाई, प्रशांत लाखे सृष्टी कगुडे तेजश्री शेळके यांना सायकल देण्यात आल्या. या सायकलीकरिता देणगीदार डी. एम. बिरादार, अण्णासो नंदाई, मोहनराव भिडे, एडवोकेट विश्वासराव चुडमुंगे, सर्जेराव घोरपडे, दयानंद छप्प्रे व विजय बनसोडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन सभासदांचा तसेच चालू महिन्यातील ज्या सभासदांची वाढदिवस आहे. त्यांचा सत्कार करण्यात आला.
Advt
सूत्रसंचालन सौ शारदा कवठे यांनी केले. त्यांचा सत्कार व कार्यक्रमाचे आभार सौ. संगीता लडगे यांनी पार पाडले.
या कार्यक्रमास रामचंद्र निमनकर, विजय पोवार, एम. के. कांबळे, प्रभाकर उरणे, बाबासाहेब पाटील, शैलेजा मिरगे, निर्मला मोरे, माया होगाडे, प्रमोदिनी देशमाने, शालिनी जगदाळे, नीता दोडनावर, प्रदीप लडगे, वैभव डोंगरे, काशिनाथ जगदाळे, डॉक्टर कुबेर मगदूम, हिमांशू मिरगे, अरुण केटकाळे, डॉक्टर प्रकाश पाटील, काशिनाथ वठारे, दिलीप शेट्टी, आप्पासाहेब कुडचे, मल्लिकार्जुन तेग्गी, शंकर लाखे, विजय सोनी, प्रकाश अकिवाटे, प्रमोद लाटणे, सदाशिव मेटे, अनिल ज्वारे, सुरज रवंदे, गजानन शिरगुरे, ज्ञानदेव मेटे, काशिनाथ टकले, जगन्नाथ पोटे, बाबासाहेब हावळे, डीजे कुरणे, दिपाली कोळी, माधवी कुलकर्णी, उज्वला होगाडे, अलका काटकर, मंगल डोंगरे, लीलावती बिरादार, रेखा कांबळे, सुषमा सोनी, कांचन चोथे, मनीषा बुगडे, नीता लाटणे, वंदना कटके इत्यादी सह क्लबचे मैबर व लाभार्थी व त्यांचे पालक हजर होते.
सायकल वितरण करताना रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह व प्रोबस क्लबचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा