ICHMH51NEWS.IN
9921600800

रेणुकानगर, यड्राव येथे बंद घर फोडून १.२० लाखांचा ऐवज लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रेणुकानगर, यड्राव येथे बंद घर फोडून १.२० लाखांचा ऐवज लंपास.

शहापूर (ता. ३० जुलै) – रेणुकानगर, यड्राव (ता. शिरोळ) येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात घुसून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,फिर्यादी चाँदबी सलीम मसुते (वय ३८, रा. रेणुकानगर, यड्राव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ जुलैच्या रात्री ९ ते ३० जुलै सकाळी ७ या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील अर्धा तोळा सोन्याचे कर्णफुले, सोन्याची अंगठी, एक तोळ्याचे गंठण, सोन्याचे पदक आणि ३०,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १.२० लाखांचा ऐवज चोरून नेला.

या चोरीप्रकरणाचा तपास सहायक फौजदार मुंगसे करत आहेत. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा